‘पतंजली’, ‘डाबर’, ‘झंडू’च्या मधात साखरेची भेसळ

‘पतंजली’, ‘डाबर’, ‘झंडू’च्या मधात साखरेची भेसळ

नवी दिल्लीः पतंजली, डाबर, वैद्यनाथ, झंडू, हितकारी व एपिस हिमालय या जनमानसात लोकप्रिय भारतीय ब्रँडच्या मधामध्ये गोडपणा येण्यासाठी त्यात साखरेची भेसळ के

आयआयटी दिल्ली, जामिया, आयएमएचा परवाना रद्द
आपत्तीची विविध रंगरूपे आणि करोना
आखिर शोले ‘क्लासिक’ क्यों है भाई

नवी दिल्लीः पतंजली, डाबर, वैद्यनाथ, झंडू, हितकारी व एपिस हिमालय या जनमानसात लोकप्रिय भारतीय ब्रँडच्या मधामध्ये गोडपणा येण्यासाठी त्यात साखरेची भेसळ केली जात असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट (सीएसई)च्या संशोधन अहवालातून निदर्शनास आले आहे.

सीएसईने भारतात विकल्या जाणार्या कच्चा मध व प्रक्रिया केलेल्या मधाची शुद्धता तपासणीसाठी १३ छोट्या-मोठ्या ब्रँडची निवड केली असता हा धक्कादायक निष्कर्ष हाती लागला आहे. मधाच्या या शुद्धता तपासणीत ७७ टक्के नमुन्यांमध्ये साखरेची भेसळ दिसून आली. तर २२ नमुन्यांपैकी ५ नमुने हे भेसळरहित आढळून आले.

डाबर, पतंजली, वैद्यनाथ, झंडू, हितकारी व एपिस हिमालय या ब्रँडचे मध ‘न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स’मध्ये भेसळयुक्त आढळून आले. जगभरात एनएमआर चाचणी मधातील भेसळ शोधण्यासाठी वापरली जाते. भारतात १३ ब्रँडपैकी सफोला, मार्कफेड सोहना व नेचर्स नेक्टर ही या चाचणीत उतीर्ण ठरले आहेत. ही चाचणी जर्मनीत करण्यात आली होती. त्यानंतर ४ महिन्यात सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी हा अहवाल सादर केला.

नैसर्गिक व शरीराला गुणकारी म्हणून भारतात मध खाल्ला जातो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत याचे सेवन केले जाते पण या मधात साखर आढळल्याने लठ्ठपणापासून ते गंभीर आजार होण्यापर्यंतची शेकडो उदाहरणे दिसत असल्याकडे सुनीता नारायण यांनी लक्ष वेधले.

चीनमध्ये फळांपासून साखर तयार केलेले एक सीरप आहे, ते मधात मिसळल्यास मधाचा शुद्धपणा चाचणीत कळत नाहीत, त्याचा फायदा या कंपन्या घेतात. २०१४-१५ या काळात चीनी कंपन्यांकडून ११ हजार दशलक्ष टन फ्रॅक्टोज भारतात आयात करण्यात आले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मधमाशा नष्ट झाल्यास आपली अन्न प्रणाली उध्वस्त होऊ शकते कारण परागीकरणासाठी मधमाशांची गरज असते. जर मधात भेसळ झाल्यास त्याचा परिणाम केवळ मानवी प्रकृतीवर नव्हे तर शेती उत्पादकतेवरही होऊ शकतो, अशी भीती सीएसईने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.

दरम्यान सीएसईच्या अहवालावर डाबर कंपनीने प्रतिक्रिया दिली असून आमच्या कंपनीवर झालेले आरोप कंपनीची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न असल्याचे म्हटले गेले आहे. आमची कंपनी सर्व २२ मापदंडांचे पालन करत आली आहे. आमच्याकडे एनएमआर यंत्रणा आहे आणि आमचा मध १०० टक्के शुद्ध आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनीही हा अहवाल कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0