ठाणे-दिवा ५ वी आणि ६ वी मार्गिका अखेर पूर्ण

ठाणे-दिवा ५ वी आणि ६ वी मार्गिका अखेर पूर्ण

ठाणे: एक दशकभराहून अधिक काळ खोळंबलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे अखेर काम पूर्ण झाले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी

सूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच!
आरोग्य हा मूलभूत अधिकार हवाः कैलास सत्यार्थी
आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.

ठाणे: एक दशकभराहून अधिक काळ खोळंबलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे अखेर काम पूर्ण झाले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गिकेचे लोकार्पण केले.

या नवीन मार्गिकांमुळे लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका राहतील. या दोन्ही मार्गिकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर शुक्रवारपासून ३६ नव्या लोकल सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश आहे. या मार्गिकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

नव्या मार्गिकांमुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून ठाणे, दिवा, कल्याण या गर्दीच्या स्थानकांना त्यांचा फायदा होईल.

या मार्गिका पूर्णत्वास नेण्यात मोठा काळ गेला. न्यायालयीन खटले, भूसंपादन व राजकीय आंदोलने यामुळे या मार्गिकांचे काम आस्ते आस्ते सुरू राहिले होते.

आता या दोन नव्या मार्गिकेने अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या नव्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे एका वर्षात सुमारे साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ होईल असे सांगितले.

शुक्रवारी दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

दिवास्वप्न पूर्ण झाले

या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते. त्याचं जाळ देशभर पसरतं. मुंबईवरून सुरुवातीला ठाणेपर्यंत रेल्वे सेवा सुरू झाली आणि त्याचा विस्तार देशभर झाला. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गिकांमुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते, रेल्वे, मेट्रो, जल वाहतूक यांच जाळ जेवढं घट्ट तेवढी विकासाला गती मिळते. मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे देशभर जाळे विणले जाते असे सांगतानाच दळणवळणाच्या या विविध सुविधा शरीरातील रक्त वाहिन्यांप्रमाणे ‘विकास वाहिन्या’ असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गीकेच्या कामासाठी केलेला पाठपुरावा आणि अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास कामांचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ब्रिटिशांनी मुंबई-ठाणे रेल्वे सुरु केली होती. त्या काळी या रेल्वेमधून प्रवास करताना लोक कसे घाबरायचे याबाबतची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. 

आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करणार

मुंबई उपनगरीय सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून सुमारे ४०० कि.मी. लांबीची अतिरिक्त मार्गिका उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वाढतील असे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय रेल्वेला आधुनिक करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून कोरोना काळात गेल्या दोन वर्षात माल वाहतूकीमध्ये रेल्वेनी विक्रमी कामगिरी केली आहे. कोरोना काळत किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम करण्यात आले. आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0