धनुष्यबाण शिवसेनेचेच चिन्ह राहणारः उद्धव ठाकरे

धनुष्यबाण शिवसेनेचेच चिन्ह राहणारः उद्धव ठाकरे

मुंबईः अडीच वर्षे ठाकरे कुटुंबियांवर, माझ्यावर, आदित्यवर टीका होत असताना या लोकांची दातखिळ बसली होती का असा सवाल माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख

मोदी- योगींचे फोटो कचरा म्हणून नेल्याने सफाई कर्मचारी निलंबित
मुंबईत मधोमध विस्तीर्ण जंगलाचा निर्णय
दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई

मुंबईः अडीच वर्षे ठाकरे कुटुंबियांवर, माझ्यावर, आदित्यवर टीका होत असताना या लोकांची दातखिळ बसली होती का असा सवाल माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील बंडखोर आमदारांना केला. राज्यात शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी मातोश्रीतून संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावू शकत नाही, या संदर्भात आपण अनेक कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञांशी बोललो असून आपले धनुष्यबाण हे चिन्ह कायम राहणार, शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये व इतरांच्या प्रचाराला बळी पडू नये असे शिवसैनिकांना केले.

धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हे लोक पाहतात व मतदान करतात, धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह राहणारच. घटनात्मक व कायदेशीर सल्ल्यानंतर मी हे बोलत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेतील बंडानंतरच्या परिस्थितीवर ठाकरे म्हणाले, गेले अनेक दिवस सामान्य शिवसैनिक मातोश्री, शिवसेना भवनात येऊन मला भेटून जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातल्या सर्व महिला जिल्हाप्रमुख आल्या, त्या वाघिणी सारख्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ही साधी माणसं होती. शिवसेनेने साध्या माणसांना मोठं केलं. साधी माणसं शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत शिवसेनेला कोणताही धोका नाही,  शिवसेना कोणीच तोडू शकणार नाही, असे ते म्हणाले.

विधीमंडळातील शिवसेना पक्षाबाबत ठाकरे म्हणाले, एक आमदार, असो वा शंभर असो सगळे गेले तरी पक्ष जाऊ शकत नाही. संभ्रम दूर करण्यासाठी मी हे सांगत असून विधीमंडळ पक्ष वेगळा असतो व रजिस्टर पार्टी वेगळी असते. धनुष्यबाणाविषयी संभ्रम मनात ठेवू नका. भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. सगळ्यांनाच पैशाचे आमिष, दमदाट्या करून नेता येत नाही. असे ठाकरे म्हणाले.

आपल्या सोबत असलेल्या आमदारांबाबत ठाकरे म्हणाले, जे १५ आमदार माझ्यासोबत आहेत त्यांचा मला अभिमान आहे. ही जिगरीची माणसे आमच्याकडे आहेत. ही माणसे कशालाही भूलली नाही. या देशात असत्यमेव जयते हे वाक्य आलेले नाही. माझा सत्यमेव जयतेवर विश्वास आहे. माझा न्यायदेवता, न्यायमंदिरावर विश्वास आहे. १२ तारखेचा निकाल लोकशाहीचे भविष्य किती काळ टिकणार आहे, आपली लोकशाही किती मजबूत राहणार आहे, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही कशी टिकेल, घटनेतील कारभार लोकशाहीच्या वाटेवर चालेल की नाही हे कळेल, असे ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लोकशाहीची ताकद किती शिल्लक आहे. देशाच्या वाटचालीवर परिणाम करणारा हा निकाल असेल. लोकशाहीचे चार स्तंभ आपली जबाबदारी कशी पाळतील हे जगाला कळेल, असेही ठाकरे म्हणाले.

बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेविषयी प्रेम दाखवतात. पण त्यांनी सूरतला जाण्यापेक्षा मला ‘सूरत’ दाखवून बोलायला हवं. या लोकांना मातोश्री, उद्धव, आदित्यबद्दल प्रेम वाटतं. हे ऐकून मी धन्य झालोय. दोन वर्षे आमच्यावर टीका झाली तेव्हा हे लोक दातखिळ बसल्यासारखी गप्प का होती, आमच्यावर विकृत टीका झाली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आहात, त्यांना मिठ्या मारता आहात, हे प्रेम तकलादू आहे. माझ्या मुलाला आयुष्यात उठवण्याचे प्रयत्न झाले. हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू दे, असेही ठाकरे म्हणाले.

साध्या माणसांनी एवढी पदे देऊन याची उत्तर शिवसेनेला द्यावी लागतील. असे खेळ घेण्यापेक्षा विधानसभा निवडणूक घ्या. आज जे काही घडलं ते अडीच वर्षांपूर्वी झालं असतं ते सन्मानाने झालं असतं, एवढा खर्च करण्याची गरज नव्हती, असाही ठाकरे यांनी टोला मारला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0