पहिले इलेक्ट्रिक वाहन राजशिष्टाचार विभागात दाखल

पहिले इलेक्ट्रिक वाहन राजशिष्टाचार विभागात दाखल

मुंबई: महाराष्ट्र सरकारने २०२१ मध्ये राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार १ जानेवारी २०२२ पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना

भारतीय वाहन उद्योगाची दशा
विद्युत वाहनांमुळे प्रदूषणात आणखी वाढ?
इलेक्ट्रीक वाहनांच्या नोंदणी सूट मर्यादेत वाढ

मुंबई: महाराष्ट्र सरकारने २०२१ मध्ये राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार १ जानेवारी २०२२ पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना ते इलेक्ट्रिक वाहन असावे, असे निर्देश देण्यात आले होते. याची सुरूवात म्हणून शुक्रवारी मकर संक्रांतीच्या दिवशी राजशिष्टाचार विभागाने जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनाकडे संक्रमण केले आहे.

राजशिष्टाचार विभागाअंतर्गत राज्य शासनाच्या अतिथींसाठी एकूण ७ वाहने घेण्यात येत असून त्यातील २ वाहने शुक्रवारी दाखल झाली आहेत. राजशिष्टाचार तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जीवाश्म इंधनावरून इलेक्ट्रिक वाहनांकडे संक्रमण करून या वाहनांचे औपचारिक स्वागत केले. स्वच्छ, हरित ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी हे संक्रमण दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उर्वरित वाहने २६ जानेवारी रोजी ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्याच्या पर्यावरण खात्याने वातावरणीय बदल रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण हा त्याचाच एक भाग असून याची सुरूवात सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करून यापूर्वीच करण्यात आली आहे. राजशिष्टाचार विभागाने याची सुरूवात करून पहिले पाऊल टाकले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0