भौतिकशास्त्र नोबेलः हवामान बदलातील व्यामिश्रतेचा शोध

भौतिकशास्त्र नोबेलः हवामान बदलातील व्यामिश्रतेचा शोध

पृथ्वीवरचे तापमान व मानवाचा पृथ्वीवरच्या पर्यावरणावरचा प्रभाव यांचा अन्योन्य संबंध असून या संबंधांवर सखोल संशोधन करणारे स्युकोरो मनाबे, क्लोस हस्सेलमा

राफेल सौद्यात आर्थिक घोटाळा
बिहारमध्येही आमचं ठरलंय, महगठबंधनचं जमलंय?
एल्गार परिषदः आरोपींना युद्ध पुकारायचे होते-एनआयएचा आरोप

पृथ्वीवरचे तापमान व मानवाचा पृथ्वीवरच्या पर्यावरणावरचा प्रभाव यांचा अन्योन्य संबंध असून या संबंधांवर सखोल संशोधन करणारे स्युकोरो मनाबे, क्लोस हस्सेलमान व जिऑर्जिओ पारिसी या तिघांना विभागून यंदाचे भौतिक शास्त्राचे नोबेल पुरस्कारसाठी निवड करण्यात आली.

स्युकोरो मनाबे, क्लोस हस्सेलमान व जिऑर्जिओ पारिसी

स्युकोरो मनाबे, क्लोस हस्सेलमान व जिऑर्जिओ पारिसी

या तिघांपैकी मनाबे व हस्सेलमान यांनी पृथ्वीवरचे हवामान व त्यावरचा मानवी प्रभाव यांवर अनेक वर्षे संशोधन केले असून त्यांनी आखून दिलेल्या मॉडेलवर आज हवामान बदलाची चर्चा सुरू आहे. तर पारिसी यांनी डिऑर्डर मटेरियल्स व रँडम प्रोसेस सिद्धांत मांडला आहे. हा सिद्धांत तापमान बदलाशी संबंधित असल्याने त्यांचीही नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पृथ्वीवरचे तापमान ही अत्यंत गुंतागुंतीची व व्यामिश्र अशी बाब असून तिचे मानवाच्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे. स्युक्योरो मनाबे यांनी पृथ्वीच्या वातावरणात वाढत्या कर्ब वायूमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे १९६० च्या दशकात प्रमेय मांडले होते. या नंतर मनाबे यांनी पृथ्वीवरचे तापमान व वातावरणातील बदल या संदर्भात संशोधनार्थ एक मॉडेल उभे केले, या मॉडेलच्या आधारावरून पुढे हवामान बदलासंदर्भात अनेक मॉडेल विकसित झाली.

मनाबे यांच्या नंतर १० वर्षानंतर ७० च्या दशकात क्लोस हस्सेलमान यांनी तापमान व हवामान यांचा संबंध असल्याचे एक मॉडेल विकसित केले. या मॉडेलच्या आधारावरून हे लक्षात आले की पृथ्वीवरचे हवामान व तापमान यातील बदल अत्यंत गुंतागुंतीचे व्यामिश्र असले तरी ते समजण्यासाठी निश्चित अशा मॉडेलची गरज असते. त्यातून हवामान बदलाविषयी निश्चित ठोकताळे बांधता येतात. हस्सेलमान यांनी नंतर निश्चित असे ‘सिग्नल्स’, ‘फिंगरप्रिंट’, ‘नैसर्गिक घडामोडी’ व ‘मानवी हालचाली’ यांचा हवामान बदलावर परिणाम होतो हे सिद्ध करून दाखवले. त्यांच्या सैद्धांतिक मांडणीमुळे हवेत सोडल्या जाणार्या कर्ब वायूमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे सिद्ध होऊ लागले.

८०च्या दशकातच पारिसी यांनी हवामान बदलातील व्यामिश्र व गुंतागुंतीचा वेध घेण्यास सुरूवात केली. त्यांनी आपल्या संशोधनात केवळ भौतिक शास्त्र नव्हे तर गणित, जीवशास्त्र, न्युरोसायन्स व मशीन लर्निंग यांचा समावेश करून हवामान बदलातील गुंतागुंतीची उकल करण्यास मदत केली.

या तिघांच्या बहुमोल शास्त्रीय संशोधनाने आज पृथ्वीवरच्या वाढते तापमान, कर्ब वायूंचे वाढते प्रमाण व त्यामुळे पृथ्वीवरच्या पर्यावरणात वेगाने झालेले बदल यावर संशोधनात्मक मांडणी करता आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0