रेस्तराँ रात्री १२ तर दुकाने ११ पर्यंत सुरू राहणार

रेस्तराँ रात्री १२ तर दुकाने ११ पर्यंत सुरू राहणार

मुंबई: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर

कोविड काळातील अर्थव्यवस्थेच्या नुकसानीची भरपाई एक दशकानंतर
कोविड मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजार
कोविड मृत्यूसंख्येबाबतचा डब्ल्यूएचओ अहवाल दडपण्याचा भारत सरकारचा प्रयत्न

मुंबई: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस असून दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला आहे.

राज्य शासनातर्फे निर्गमित करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, पूर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसून फक्त रेस्टॉरंट, खाद्य पदार्थ पुरविणारे यांच्यासाठीच रात्री १२ पर्यंत आपले आस्थापना चालू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे इतर आस्थापना ११ वाजेपर्यंत चालू राहतील. स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लावू शकते किंवा सवलत देऊ शकते असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: