लिलावाच्या नवीन पद्धती शोधणाऱ्या अर्थतज्ज्ञांना नोबेल

लिलावाच्या नवीन पद्धती शोधणाऱ्या अर्थतज्ज्ञांना नोबेल

पॉल आर. मिलग्रोम व रॉबर्ट बी. विल्सन हे दोघेही अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाचे आहेत. लिलावाच्या कार्यपद्धतीचा या दोघांनीही सखोल अभ्यास केला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी, पारंपरिक पद्धतीने ज्यांची विक्री कठीण आहे अशा माल व सेवांसाठी (उदाहरणार्थ, रेडिओ फ्रिक्वेन्सी) लिलावाच्या नवीन पद्धती, विकसित केल्या.

४९ ‘देशद्रोही’ मान्यवरांच्या बाजूने उतरले १८५ कलावंत
पक्ष्यांच्या आवाजाची किमया
लॉकडाऊन : केंद्राचे पॅकेज आणि तृतीयपंथी समुदाय

लिलावाच्या सिद्धांतात सुधारणा घडवून आणणारे व लिलावासाठी नवीन आराखडे विकसित करणारे अर्थतज्ज्ञ पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना २०२० सालासाठीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांमधील अर्थशास्त्रासाठीच्या स्वेर्जीत रिक्सबँक पारितोषिकासाठी मिलग्रोम व विल्सन यांची निवड करण्याचा निर्णय रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने केला आहे.

लिलावाच्या पद्धतींचा अभ्यास

पॉल आर. मिलग्रोम व रॉबर्ट बी. विल्सन हे दोघेही अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाचे आहेत. लिलावाच्या कार्यपद्धतीचा या दोघांनीही सखोल अभ्यास केला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी, पारंपरिक पद्धतीने ज्यांची विक्री कठीण आहे अशा माल व सेवांसाठी (उदाहरणार्थ, रेडिओ फ्रिक्वेन्सी) लिलावाच्या नवीन पद्धती, विकसित केल्या. त्यांनी केलेल्या संशोधनाचा लाभ जगभरातील विक्रेते, ग्राहक व करदाते घेत आहेत.

विक्रीच्या इतिहासात विक्रेत्यांनी नेहमीच सर्वोच्च बोली लावणाऱ्यांना वस्तू किंवा सेवा विकल्या आहेत, तसेच, सर्वांत स्वस्त दराचा प्रस्ताव ठेवणाऱ्याला ग्राहकांनी पसंती दिलेली आहे. आज प्रचंड किमतीच्या वस्तू दररोज लिलावांद्वारे विकल्या जातात. यात केवळ गृहोपयोगी वस्तू, कलाकृती व प्राचीन वस्तूच नव्हे, तर सिक्युरिटीड, क्षार व ऊर्जेचाही समावेश होतो. सार्वजनिक खरेद्याही लिलावाच्या स्वरूपात घेतल्या जातात.

लिलावाच्या सिद्धांताचा उपयोग करून संशोधक बोली लावणे व अंतिम खरेदी यांची निष्पत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यातूनच ऑक्शन फॉरमॅट अर्थात लिलावाची पद्धत आकाराला येते. या पद्धतीचे विश्लेषण कठीण असते, कारण, बोली लावणारे खूपच धोरणीपणे वागतात, उपलब्ध माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेतात. त्यांच्याजवळ असलेल्या माहितीचा तर ते विचार करतातच, शिवाय, अन्य बोली लावणाऱ्यांकडे काय माहिती असू शकेल याचाही विचार ते नक्कीच करतात.

खरेदी-विक्रीसाठी लिलावाची पद्धत जगभरात वापरली जाते. ही पद्धत बहुतेक सर्वच क्षेत्रांमध्ये वापरली जात असल्याने याचा माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम होतो, असे नोबेल समितीने नमूद केले आहे.

सिद्धांतामध्ये सुधारणा

रॉबर्ट विल्सन यांनी समान मूल्याच्या वस्तूंसाठी लिलावाचा सिद्धांत विकसित केला. समान मूल्य म्हणजे प्रारंभी हे मूल्य अनिश्चित असते पण अखेरीस हे सर्वांसाठी समान ठरते. याच्या उदाहरणांमध्येही रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या भविष्यकाळातील मूल्याचा समावेश होऊ शकेल किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील क्षारांच्या घनफळालाही सामान्य मूल्याची वस्तू म्हटले जाऊ शकते. तर्कशुद्ध विचार करणारे लिलावकर्ते (बिडर्स) समान मूल्याबद्दलच्या त्यांच्या सर्वांत अचूक अंदाजाहून कमी बोली का लावतात हे विल्सन यांनी दाखवून दिले. विल्सन यांच्या मते त्यांना विनर्स कर्सची चिंता वाटते. अर्थात खूप पैसा मोजावा लागण्याची आणि बोली हरण्याची चिंता त्यांना वाटते.

पॉल मिलग्रोम यांनी लिलावाचा आणखी सामान्य सिद्धांत तयार केला. यात समान मूल्यांनाच नव्हे तर खासगी मूल्यांनाही मुभा दिली जाते. ही खासगी मूल्ये प्रत्येक बिडरप्रमाणे बदलतात. त्यांनी बिडिंगच्या धोऱणांचे विश्लेषण अनेक सुपरिचित लिलाव पद्धतींमध्ये केले आणि लिलावाचे निश्चित स्वरूप विक्रेत्याला अपेक्षित उत्पन्नाहून अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकतो हे दाखवून दिले. जेव्हा बिडर्सना बोली लावताना एकमेकांच्या अंदाजित मूल्यांबद्दल अधिक माहिती असते, त्यावेळी विक्रेत्याचे उत्पन्न वाढते हे त्यांनी दाखवून दिले.

काळाच्या ओघात समाजांनी वापरकर्त्यांना अधिकाधिक जटील वस्तूही वितरित केल्या. यांमध्ये लँडिंग स्लॉट्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीजचा समावेश होतो.

याला प्रतिक्रिया म्हणून मिलग्रोम व विल्सन यांनी लिलावाच्या नवीन पद्धती शोधून काढल्या. यात कमाल उत्पन्नासाठी नाही, तर समाजाच्या लाभासाठी प्रेरित अशा विक्रेत्याद्वारे परस्परांशी संबंधित अनेक वस्तूंचा एकाच वेळी लिलाव करण्याच्या पद्धतीचा समावेश आहे. १९९४ मध्ये अमेरिकेतील यंत्रणांनी प्रथमच दूरसंचार ऑपरेटर्सना रेडिओ फ्रिक्वेन्सीज विकण्यासाठी त्यांच्या लिलाव पद्धतीचा उपयोग केला. त्यानंतर अनेक राष्ट्रांनी अमेरिकाचा कित्ता गिरवत या लिलावपद्धतीचा वापर केला.

यंदाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञांनी अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांतापासून सुरुवात केली आणि नंतर त्यातून आलेल्या निष्पत्तीचा उपयोग त्यांनी व्यवहारातील उपयोजनांमध्ये केला. त्यांनी विकसित केलेल्या लिलावपद्धतींचा प्रसार आता जगभरात झाला आहे. त्यांची संशोधने समाजाला खूपच लाभदायी ठरत आहेत,” असे नोबेल पारितोषिक समितीचे चेअर पीटर फ्रेड्रिकसन म्हणतात.

पारितोषिकविजेत्यांचा परिचय

पॉल आर. मिलग्रोम यांचा जन्म १९४८ मध्ये अमेरिकेतील डेट्रॉइट येथे झाला. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातून १९७९ मध्ये पीएचडी संपादन केली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातच त्यांनी अध्यापनाचे काम केले.

रॉबर्ट बी विल्सन यांचा जन्म अमेरिकेतील जिनिव्हा येथे १९३७ मध्ये झाला. अमेरिकेतील कॅम्ब्रिज येथील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी १९६३ मध्ये डीबीए पदवी घेतली. स्टॅनफर्ड विद्यापीठात ते अॅडम्स डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट म्हणून कार्यरत होते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0