दिल्ली दंगलीचे प्रकरण हाताळणाऱ्या न्यायाधीशांची बदली

दिल्ली दंगलीचे प्रकरण हाताळणाऱ्या न्यायाधीशांची बदली

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराची सुनावणी ज्या न्यायाधीशांपुढे सुरू होती ते दिल्ली उच्च न्यायालयातील न्या. एस. मुरलीधर यांची गुरुवारी बदली झाली. शहरातील

राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी
चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन का दिला?
ई-सिगरेट वरील बंदी कायम ठेवा! हजारहून अधिक डॉक्टरांचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराची सुनावणी ज्या न्यायाधीशांपुढे सुरू होती ते दिल्ली उच्च न्यायालयातील न्या. एस. मुरलीधर यांची गुरुवारी बदली झाली. शहरातील हिंसाचारासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारीच पोलिसांना भडकाऊ भाषण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर फिर्याद दाखल करण्यास सांगितले होते, त्यानंतर न्या. मुरलीधर यांची बदली झाली. या बदलीचे वृत्त आल्यानंतर लगेचच काँग्रेसने ही बदली भाजपच्या नेत्यांना वाचवण्यासाठी व भाजपचा दिल्ली दंगलीमागील हात उघड होऊ नये म्हणून करण्यात आली असा आरोप केला आहे. दंगलीचे प्रकरण हाताळणाऱ्या न्यायाधीशाची बदली करून मोदी सरकार न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर हल्ला करू पाहात आहे, भाजप सरकारला एवढे भय का आहे, अशा किती न्यायाधीशांची सरकार बदली करणार आहे, असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या महासरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही या बदलीवर आक्षेप घेत न्याय व्यवस्थेवर सरकार आक्रमण करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत  दिवंगत न्या. लोया यांचे स्मरण केले.

बदली नियमानुसारकायदा मंत्री

न्या. मुरलीधर यांच्या बदलीमुळे आरोपांच्या तावडीत सापडलेल्या केंद्र सरकारने न्या. मुरलीधर यांच्या बदलीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १२ फेब्रुवारी रोजीच घेतला होता व त्या बदलीला न्या. मुरलीधर यांची संमती असल्याचा दावा केला. केंद्रीय कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायाधाशींच्या बदलीचे राजकारण करण्याची संधी घेत काँग्रेसने न्यायव्यवस्थेविषयी आपला संशय व्यक्त केला असून काँग्रेसला जनतेने पुन्हा नाकारले आहे आता हा पक्ष अन्य संस्थांना नष्ट करण्यासाठी त्यावर हल्ला करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. त्यावर सुनावणीही झाली होती. आता त्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून ही मंडळी न्यायालयाचा अवमान तर करतच आहेत पण राहुल गांधी स्वत:ला सर्वोच्च न्यायालयाच्या वर समजतात का, असा सवालही रवी शंकर प्रसाद यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: