भारलेल्या काळाचा अंत – वामन केंद्रे  

भारलेल्या काळाचा अंत – वामन केंद्रे  

इब्राहिम अल्काझी यांचे निधन म्हणजे, भारलेल्या काळाचा अंत आहे, अशा शब्दात ‘एनएसडी’चे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यानी अल्काझी यांना श्रद्धांजली अर्प

आदरणीय इब्राहिम अल्काझी सर…
इब्राहिम अल्काझी : रंगकर्मींचे श्रेष्ठ नाट्यगुरू
भारतीय रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्राचा प्रणेता

इब्राहिम अल्काझी यांचे निधन म्हणजे, भारलेल्या काळाचा अंत आहे, अशा शब्दात ‘एनएसडी’चे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यानी अल्काझी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

केंद्रे म्हणाले, “आधुनिक भारतीय थिएटर चळवळीचा पाया घालणाऱ्या संस्थापकांपैकी इब्राहिम अल्काझी एक होते. ते भारतीय नाट्यसृष्टी आणि दृश्य कलेतील बहुमुखी, बहुगुणसंपन्न आणि दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारतीय आधुनिक नाट्य सृष्टीचा पाया घातला. नाट्य प्रशिक्षणाला त्यांनी भारतामध्ये आदराचे स्थान मिळवून दिले. “

प्रा. वामन केंद्रे  ‘द वायर मराठी’शी बोलताना म्हणाले, “ते राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्थेचे (एन एस डी) सुमारे दोन दशके संचालक होते. त्यांनी आपल्या नाट्य कृतींद्वारे प्रावीण्य, व्यावसायिकता, गुणवत्ता आणि सौंदर्याची परिमाणे तयार केली. कामावर दृढनिष्ठा आणि शिस्त असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अल्काझी! सर्वच बाबतीत त्यांचे भारतीय नाट्य सृष्टीला असलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी भारतातील हजारो नाट्यकर्मिंना प्रेरित केले, प्रशिक्षीत केले, ज्यांनी संपूर्ण देशात नाट्य चळवळ निर्माण केली. भारतातील नाट्य शिक्षक, विद्यार्थी, नाट्यकर्मी आणि नाट्य प्रेमी त्यांना सदैव स्मरणात ठेवतील. नाट्य महर्षीला अखेरचा सलाम.”

इब्राहिम अल्काझी 

भारतीय नाट्यसृष्टीतील पितामह ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे काळ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांचे काल दुपारी पावणे तीन वाजता रुग्णालयात निधन झाल्याचे त्यांचा मुलगा फैजल यांनी सांगितले. त्यांना २ ऑगस्टला मुंबईतील एस्कॉर्ट रुग्णालययात दाखल केले होते.

त्यांचा जन्म १८ जुलै १९२५ मध्ये पुण्यात झाला. अलकाझी यांचे वडील सौदी अरेबियातले व्यापारी होते तर आई कुवेतमधली होती. पुण्यातल्या सेंट व्हीन्सेंट हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. त्यानं अरेबिक, मराठी, गुजराती आणि इंग्रजी या भाषा येत होत्या. अलकाझी यांना नऊ भावंडे होती. त्यांचे बालपण पुण्यात लाल देऊळ परिसरात गेले. १९४७ मध्ये फाळणी झाल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात गेले. त्यांनी मात्र भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालायातून शिक्षण घेतल्यानंतर सुलतान बॉबी पदमसी यांच्या नाटक ग्रुपबरोबर त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर ते लंडनमध्ये रॉयल अकादमी ऑफ ड्रामाटीक आर्ट्समध्ये शिकण्यासाठी गेले.

१९४० च्या दशकात ते मुंबईत आले आणि अल्पावधीतच एक उत्तम अभिनेते म्हणून परिचित झाले. त्यांनी भारतीय रंगभूमीला शेक्सपिअर आणि ग्रीक नाट्यकृतींशी ओळख करून दिली. या कलाकृती भारतीय रंगमंचावर आणल्या. त्यामुळे भारतीय रंगभूमीचा कायापालट झाला. ग्रीकच्या शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रिक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटके त्यांनी भारतीय रंगभूमीवर आणली.

१९६२ ते १९७७ या १५ वर्षांच्या कालावधीत ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. ‘एनएसडी’च्या संचालक पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी संचालक पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर दिल्लीत त्यांनी पत्नी रोशन अल्काझी यांच्याबरोबर आर्ट हेरिटेज सुरु केलं. त्यामध्ये त्यांच्या कलाकृती, फोटो ठेवले होते.

त्यांनी गिरीश कर्नाड यांचे ‘तुघलक’, धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ या लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यानी अनेक कलाकार घडवले. त्यामध्ये नसीरुद्दीन शाह, ओम पुरी यांचा समावेश आहे. ‘एनएसडी’मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये विजया मेहता, ओम शिवपुरी, बलराज पंडित, मनोहर सिंह, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सुहास जोशी, बी. जयश्री, जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी या कलाकारांचा संवेश आहे.

१९६६ मध्ये त्यांना पद्मश्री, १९९१ पद्म भूषण आणि २०१० मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. दोनवेळा संगीत नाटक अकादमी सन्मानही त्यांना मिळाला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0