‘टिकटॉक’, ‘हेलो’ला केंद्राची तंबी

‘टिकटॉक’, ‘हेलो’ला केंद्राची तंबी

नवी दिल्ली : सोशल मीडियात अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘टिकटॉक’ (TikTok), ‘हेलो’ (Helo) या दोन प्लॅटफॉर्मवरून देशद्रोही माहिती पसरवली जात असल्याच्या तक्रा

३७० कलम रद्द केल्याचे अंतिम साध्य काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी
देशात महाराष्ट्राचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दुसरा क्रमांक

नवी दिल्ली : सोशल मीडियात अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘टिकटॉक’ (TikTok), ‘हेलो’ (Helo) या दोन प्लॅटफॉर्मवरून देशद्रोही माहिती पसरवली जात असल्याच्या तक्रारीवरून इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने या दोन कंपन्यांना २१ प्रश्न विचारले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. या नोटीशीचे योग्य उत्तर न दिल्यास या दोहोंबर बंदी घालण्याची तंबी सरकारने दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधानांकडे या दोन प्लॅटफॉर्मविषयी तक्रार केली होती, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान खात्याने या दोन कंपन्यांना नोटीस पाठवल्या आहेत. या नोटीशीत या दोन प्लॅटफॉर्मच्या देशातील वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी आपली कोणतीही माहिती अन्य देशाला व तिसऱ्याला देण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर या दोन प्लॅटफॉर्मवरून खोट्या बातम्या, माहिती न पसरवण्याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

माहिती व तंत्रज्ञान खात्याने ‘हेलो’कडून त्यांच्या गुंतवणुकीबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. हेलोने सुमारे ११ हजार राजकीय जाहिरातींच्या रुपिका बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने मागितले आहे.

अशा प्लॅटफॉर्ममुळे १८ वर्षाखालील मुलांच्या गोपनीय कायद्याचा भंग होत असल्याबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली आहे.

या संदर्भात ‘टिकटॉक’ व ‘हेलो’च्यावतीने एक प्रसिद्धीपत्र जाहीर करण्यात आले असून आम्ही भारताची बाजारपेठ पाहून येत्या तीन वर्षांत एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे या कंपन्यांनी सांगितले आहे. आमचे अॅप भारतीय समाजात अत्यंत लोकप्रिय असून कोट्यवधी ग्राहकांच्या मदतीने त्याचा विस्तार होत आहे. त्यामुळे या अॅपवर येणारी कोणतीही माहिती काळजीपूर्वक प्रसिद्ध व्हावी याची आमच्यावर जबाबदारी असून या देशाचे कायद्यांचे पालन केले जाईल अशी हमी या दोन कंपन्यांनी दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0