दिशा, निकिता, शांतनूवर गंभीर आरोप

दिशा, निकिता, शांतनूवर गंभीर आरोप

नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनासंदर्भात टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिशा रवी, निकिता जेकब, शांतनू यांच्यावर प्रजासत्ताक दिनी शहरात हिंसाचार भडकवल्याचे

दिल्ली दंगलः १७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल
विद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका
दिल्ली जिंकण्यासाठी भाजप अस्वस्थ का?

नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनासंदर्भात टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिशा रवी, निकिता जेकब, शांतनू यांच्यावर प्रजासत्ताक दिनी शहरात हिंसाचार भडकवल्याचे गंभीर आरोप लावले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या तिघांनी शेतकरी आंदोलनाची टूलकिट तयार करून ती सोशल मीडियावर शेअर केली. हे टूलकिट दिशाने टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना शेअर केले. हे टूलकिट खलिस्तानी संघटनांच्या मदतीने तयार केले, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जो हिंसाचार झाला त्या अगोदर ११ जानेवारीला या सर्वांची एक झूम मिटिंग झाली होती. या मिटिंगमध्ये खलिस्तान समर्थक कॅनडाच्या नागरिक पुनीत उपस्थित होत्या. त्यांच्या माध्यमातून दिशा, निकिता, शांतनु व अन्य कार्यकर्त्यांना जोडण्यात आले. ११ जानेवारीला निकिता व शांतनूने पोएटिक जस्टिस फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या मदतीतून प्रजासत्ताकदिनी ‘ट्विटर स्ट्रॉम’ व ‘डिजिटल स्ट्राइक’ करण्याचा त्यांचा हेतू होता, असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

दिल्ली पोलिसांनी दिशा रवी यांच्या मोबाइलमधून महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे तसेच त्यांनी मोबाइलमधून नष्ट केलेली माहितीही मिळाल्याचे सांगितले. शांतनु व दिशा या एक्सआर नाम या एनजीओशी जोडलेले आहेत. यांच्यासोबत पीटर फेडरिक या अन्य तरुणाने एक योजना तयार केली. त्यात ट्विटरवर कोणते हॅश टॅग करावे लागणार, कोणाला फॉलो करायचे, कोणते ट्विट करायचे असे पर्याय होते. शांतनुने [email protected] हा इमेल तयार केला होता, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्ली पोलिसांनी पुढे सांगितले की, या टूलकिटच्या संदर्भात ९ फेब्रुवारीला निकिता जेकब या वकिलाच्या विरोधात सर्च वॉरंट निघाले होते. ११ फेब्रुवारीला निकिताच्या घरी चौकशी करण्यात आली. यात अनेक संवेदनशील पुरावे मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. निकिता यांनी १२ फेब्रुवारीला आपण हजर राहू असे पोलिसांना सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: