त्रिपुरा हिंसाचार वार्तांकनः २ पत्रकारांना जामीन

त्रिपुरा हिंसाचार वार्तांकनः २ पत्रकारांना जामीन

आगरतळा/करीमगंजः त्रिपुरातील धार्मिक हिंसाचाराचे वार्तांकन करण्यास गेलेल्या व पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिला पत्रकार समृद्धी सकुनिया व स्वर्ण झा यांन

आसाममध्ये पोलिसांचा स्थानिकांवर गोळीबार
आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!
रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ

आगरतळा/करीमगंजः त्रिपुरातील धार्मिक हिंसाचाराचे वार्तांकन करण्यास गेलेल्या व पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिला पत्रकार समृद्धी सकुनिया व स्वर्ण झा यांना सोमवारी गोमती जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिला. या महिला पत्रकारांवर पोलिसांनी धार्मिक हिंसाचार फैलावण्याचा, खोटी व बनावट वृत्त पसरवण्याचे आरोप ठेवले होते व त्यांना रविवारी आसाम-त्रिपुरा सीमेवर करीमगंज येथे ताब्यात घेतले होते.

या दोन्ही पत्रकार एचडब्लू न्यूज नेटवर्क या वृत्तसंस्थेच्या कर्मचारी असून गेला आठवडाभर त्या त्रिपुरात उफाळलेल्या धार्मिक दंगल, हिंसाचाराचे वृत्तांकन करत होत्या. त्यांच्या या वृत्तांकनावर विश्व हिंदू परिषदेचे नेते कंचन दास यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. या दोन महिला पत्रकार मुस्लिम बहुल पॉल बाजारात हिंदूंविरोधात व त्रिपुरा सरकारच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत होत्या व त्यांनी त्रिपुरातील हिंसाचारप्रकरणात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या दोन संघटनांना जबाबदार धरले होते. या दोन्ही पत्रकार त्रिपुरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न करत असून त्या कटाचा एक भाग असल्याचा आरोप कंचन दास यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आला होता.

या तक्रारीचा आधार घेत त्रिपुरा पोलिसांची एक टीम आगरतळातील धर्मानगर भागात या दोन महिला पत्रकार वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये पोहचली आणि त्यांनी दोघींची चौकशी केली होती. नंतर या दोन महिला पत्रकारांना रविवारी आसाममध्ये करिमगंज येथील निलामबझार पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.

आसाम पोलिसांतील एका अधिकार्याने सांगितले, या दोन महिला पत्रकारांना रविवारी रात्र सरकारद्वारा संचालित महिला आश्रय गृहात ठेवण्यात आले होते. सोमवारी त्यांना त्रिपुरा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: