त्रिपुरा हिंसाचारः २ पत्रकारांना अटक

त्रिपुरा हिंसाचारः २ पत्रकारांना अटक

नवी दिल्लीः त्रिपुरा येथील धार्मिक हिंसाचाराचे वृत्तांकन करताना धार्मिक तेढ निर्माण करणे, वैमनस्य पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे, असा आरोप ठेवत आसाम पो

पीपीई किट्सच्या खरेदीबाबत सरमा यांच्या खोट्या वल्गना?
आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत
कलम ३७१ला हात लावणार नाही : अमित शहा

नवी दिल्लीः त्रिपुरा येथील धार्मिक हिंसाचाराचे वृत्तांकन करताना धार्मिक तेढ निर्माण करणे, वैमनस्य पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे, असा आरोप ठेवत आसाम पोलिसांनी समृद्धी सकुनिया व स्वर्णा झा या दोन महिला पत्रकारांना रविवारी आसाम-त्रिपुरा सीमेवरील निलामबझारमध्ये स्थानबद्ध केले. या दोन पत्रकार एचडब्लू न्यूज नेटवर्कसाठी काम करत आहेत.

गेला आठवडाभर त्या त्रिपुरात उफाळलेल्या धार्मिक दंगल, हिंसाचाराचे वृत्तांकन करत होत्या. त्यांच्या या वृत्तांकनावर विश्व हिंदू परिषदेचे नेते कंचन दास यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. या दोन महिला पत्रकार मुस्लिम बहुल पॉल बाजारात हिंदूंविरोधात व त्रिपुरा सरकारच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत होत्या व त्यांनी त्रिपुरातील हिंसाचारप्रकरणात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या दोन संघटनांना जबाबदार धरले होते. या दोन्ही पत्रकार त्रिपुरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न करत असून त्या कटाचा एक भाग असल्याचा आरोप कंचन दास यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आला होता.

या तक्रारीचा आधार घेत त्रिपुरा पोलिसांची एक टीम आगरतळातील धर्मानगर भागात या दोन महिला पत्रकार वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये पोहचली आणि त्यांनी दोघींची चौकशी केली.

या चौकशीसंदर्भात द वायरने या दोघींशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्याः शनिवारी रात्री १०.३०च्या सुमारास पोलिस आले आणि त्यांनी पहाटे ५.३० वाजता आम्हाला आमच्यावर दाखल झालेल्या फिर्यादीची प्रत दिली. आम्ही सकाळी आगरतळा शहर सोडणार होतो. पण आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य देऊनही त्यांनी शहर सोडता येणार नाही असे बजावले. त्यांनी आम्हाला धमकावलेही, असे या दोघींचे म्हणणे होते.

पोलिसांनी या दोन महिला पत्रकारांच्या प्रवासाची सर्व माहिती, आधार कार्डची माहिती घेतली आहे.

या दोन महिला पत्रकारांना रविवारी आसाममध्ये करिमगंज येथील निलामबझार पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.

दरम्यान द एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या दोन पत्रकारांची त्वरित सुटका करावी अशी मागणी केली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: