शेतकरी आंदोलनात ट्रॉली टाईम्स, ‘सांझी तत्थ’ आणि ग्रंथालय

शेतकरी आंदोलनात ट्रॉली टाईम्स, ‘सांझी तत्थ’ आणि ग्रंथालय

शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी व आंदोलनाचा  सर्व अंगाने अभ्यास करण्यासाठी आम्ही काही शेतकऱ्यांची मुलं ३१ डिसेंबरला दिल्लीत आंदोलन स्थळी पोहचलो. उद्देश हाच होता,  की दिशाभूल करणाऱ्या बातम्या बघण्यापेक्षा प्रत्यक्ष घटना स्थळी जावून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.

‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’
अपुरे पुरावे; दिशा रवी यांना अखेर जामीन
कोणत्याही पक्षाचा संबंध नाहीःशेतकऱ्यांचे मोदींना पत्र

शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी व आंदोलनाचा  सर्व अंगाने अभ्यास करण्यासाठी आम्ही काही शेतकऱ्यांची मुलं ३१ डिसेंबरला दिल्लीत आंदोलन स्थळी पोहचलो. उद्देश हाच होता,  की दिशाभूल करणाऱ्या बातम्या बघण्यापेक्षा प्रत्यक्ष घटना स्थळी जावून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.

'ट्रॉली टाइम्स'

‘ट्रॉली टाइम्स’

सिंघु बॉर्डरवर पोहचण्याअगोदर दिल्ली पोलिसांनी मास्क लावण्याची तंबी देवून स्वागत केले. हरियाणा व दिल्ली यांची ग्रैंड ट्रक रोडवर जी सीमा आहे ती म्हणजे सिंघु बॉर्डर. याच सिंघु बॉर्डरवर दिल्लीकडे तोंड करुन शेतकरी आंदोलन करत आहेत.

तिथे पोहचल्यावर मला असे समजले, की सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या ट्रक्टर ट्रोल्या, राहण्याचे तंबू, लंगर व्यवस्था ही २५ ते ३० कि.मी. लांब पसरलेली आहे. अशीच व्यवस्था टिकरी बॉर्डरवरसुद्धा आहे. याच आंदोलनाच्या ठिकाणी सुरू झाले आहे. ‘ट्रॉली टाइम्स’ नावाचे वार्तापत्र.

'सांझी सत्थ'

‘सांझी सत्थ’

किसान आंदोलनाच्या सुरुवातीच्या वेळेस (२७ नोव्हेंबर) काही तरुण एकत्र आले आणि आंदोलनातील घडामोडींचा प्रचार व्हावा, या बाबत विचार झाला व ‘ट्रॉली टाइम्स’ ही कल्पना उदयास आली. ही कल्पना मुख्यत्वे ट्रॉलीमध्ये बसल्यावर सुचल्याने या पत्रकाचे नाव ‘ट्रॉली टाइम्स’ ठेवण्यात आले.

नुकतेच तयार केलेले पोस्टर

नुकतेच तयार केलेले पोस्टर

‘ट्रॉली टाइम्स’ हे वार्तापत्र कुणी एकाने तयार केले नसून, उत्साही तरुणांच्या गटाने तयार केले आहे. दर आठवड्याला याचे दोन अंक प्रकाशित केले जातात. हे वार्तापत्र पंजाबी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित केले जाते. महत्वाचे म्हणजे हे वार्तापत्र आंदोलन स्थळी निर्माण झाले आहे व फक्त आंदोलनाशी संबंधीत घटनांचेच यामध्ये वार्तांकन केले जाते.

वार्तापत्र वितरीत करणारा युवक.

वार्तापत्र वितरीत करणारा युवक.

या वार्तापत्राचे वितरण करण्यासाठी काही तरुण आंदोलन स्थळावरील वेगवेगळ्या मार्गांवर उभे राहुन अंकाचे मोफत वाटप करतात. तसेच प्रत्येक ट्रॉलीपर्यंत हा अंक पोहचविण्यासाठी प्रयत्न करतात. या वार्तापत्राचा महत्वाचा उद्देश हाच आहे, की प्रत्येक ट्रॉलीपर्यंत आंदोलनाचे वृत पोहचावे. सरकारचे निर्णय, किसान नेत्यांचे विचार, आंदोलक प्रतिनिधींचे विचार, आंदोलनाचे वेगवेगळे फोटो सर्वांपर्यंत पोहचावेत.

हे वार्तापत्र चार पानी असून, यामध्ये आठवड्यातील महत्वाच्या घडामोडी, आंदोलक लेखकांची मनोगते, तसेच आंदोलनातील फोटो, परिवर्तनवादी शेतकरी, कविता असा मजकुर छापलेला असतो. सर्वसाधारण शेतकऱ्यांना समजेल, अशा सोप्या भाषेचा वापर केला जातो.

आंदोलक खूप उत्साहाने या अंकाची वाट बघतात व संध्याकाळच्या आपापल्या मिटींगमध्ये त्यातील घडामोडीवर चर्चा करतात. या वार्तापत्रामध्ये पहिल्या पानाच्या वरच्या बाजूस एक मजकुर लिहिलेला आहे तो असा – ‘पुरखो ने हल चलाकर कलम के लायक बनाया, अब कलम का फर्ज है, वो हल का कर्ज चुकाए!’    महत्वाचं म्हणजे शेकऱ्यांचा आवाज देशभर पोहचविण्यासाठी या अंकाची ऑनलाइन प्रत www.trolleytimes.online इंटरनेटवर उपलब्ध आहे.

पोस्टर तयार होताना.

पोस्टर तयार होताना.

आंदोलन स्थळी दुसरी महत्त्वाची एक जागा पाहायला मिळाली, टी म्हणजे, ‘सांझी सत्थ’.  ‘सांझी सत्थ’ नावाचा तंबू दिसल्यावर आम्ही उत्सुकतेपोटी तिथे भेट दिली. त्यामध्ये वेगवेगळ्या परिवर्तनवादी लेखकांची पंजाबी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके मांडलेली दिसली. ‘सांझी सत्थ’मध्ये काय चालते? साधारणपणे सकाळी ६ ते ११ च्या दरम्यान ५ ते ६ युवकांचा गट असणारे काही गट (साधारण ५० ते ६० युवक) पोस्टर बनविण्याचे काम करतात. त्यामध्ये पंजाबी, हिंदी, इंग्रजी व आम्ही प्रयत्नपूर्वक तयार केलेली मराठी भाषेतील पोस्टर यांचा समावेश आहे. पोस्टरमध्ये मोदी-शहा यांच्या हुकुमशाही निर्णयांचा विरोध तर दर्शविलेला असतोच, पण त्याचबरोबर परिवर्तनवादी चारोळ्या, कविता वा घोषणांचा समावेश आहे. नंतर या सर्व पोस्टरचे प्रदर्शन तिथेच

पोस्टर दाखवताना

पोस्टर दाखवताना

मांडले जाते. काही युवक पोस्टर घेवून आंदोलन स्थळी जावून घोषणा देतात. सर्व क्रिया शांततेतच पार पाडली जाते. या सकाळच्या वेळेस काही पत्रकार तेथील जेष्ठ मंडळींच्या मुलाखती घेतात. ११  वाजेपासुन दुपारी २ वाजेपर्यंत सिंघु बॉर्डर परिसरातील स्थानिक लहान मुलांची कौशल्य, मूल्य

आंदोलनादरम्यान आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते.

आंदोलनादरम्यान आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते.

विकसित करण्यासाठी शाळा भरविली जाते. यामध्ये ८ वर्षाखालील साधारण १००-१५० विद्यार्थी सहभागी होतात. त्यांची वर्तुळाकार बैठक करून आणि छोटे छोटे गट तयार करून, त्यांना चित्रकला, इंग्रजी मुळाक्षरे, हिंदी मुळाक्षरे शिकविली जातात. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना मजेशीर गोष्टी सांगितल्या जातात. शैक्षणिक खेळ, गाणी, कविता शिकविल्या जातात.

 पुस्तकांचे प्रदर्शन

पुस्तकांचे प्रदर्शन

या ‘सांझी तत्थ’मध्ये समोरच्या बाजूस पुस्तकांचे प्रदर्शन लावलेले आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वांसाठी खुले असते. ६ वाजेनंतर याच ठिकाणी आजुबाजुच्या परिसरातील ट्रॉलींमधील शेतकरी मिटिंगसाठी जमा होतात. मिटिंग ७ ते ९ च्या दरम्यान दररोज होते. या मिटींगमध्ये आंदोलनस्थळी रोज घडणाऱ्या घटनांचा लेखाजोखा सर्वांना समजतो. शेतकरी नेत्यांची भूमिका, सरकार सोबत झालेली चर्चा, त्याचे फलित याबाबत सर्व एकत्रपणे चर्चा करतात. आंदोलनस्थळी एखादी विपरीत घटना घडल्यास त्यावर चर्चा होते व अशी घटना पुन्हा होवू नये म्हणून आपण काय प्रयत्न करावे, यावर चर्चा होते. याठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्यावर काही तरुण परिवर्तनवादी गाणी, कविता म्हणतात.  तसेच आपापले अनुभव मांडतात. आंदोलनासाठी एकमेकांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्तेक जण प्रयत्न करत असतो. हे एकप्रकारे संघटीत राहून उत्तम समन्वय साधण्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

‘सांझी सत्थ’प्रमाणेच जसवीर सिंग आणि किरणप्रीत सिंग या २ तरुणांनी आंदोलनस्थळी ‘जंगी लायब्ररी’ सुरु केलेली आहे. खूप आकर्षक अशी मांडणी करण्यात आली असून, येथे विविध भाषेतील पुस्तके वाचण्यासाठी शेतकरी आपल्या ट्रॉलीमध्ये घेवून जावू शकतात. ही पुस्तके शेतकरी २ दिवसांपर्यंत वाचू शकतात. पुस्तक नेताना पुस्तकांची मुळ किंमत जमा करून घेतली जाते आणि पुस्तक परत करते वेळी पैसे परत दिले जातात. ही योजना आंदोलनस्थळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.

प्रशांत ढेंगेपाटील, हे सध्या पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

(सर्व छायाचित्रे – प्रशांत ढेंगेपाटील)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0