टीआरपी घोटाळाः १४०० पानांचे आरोपपत्र

टीआरपी घोटाळाः १४०० पानांचे आरोपपत्र

मुंबईः रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मंगळवारी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्याया

कोरोनावर गुजरात सरकारकडून होमिओपॅथी औषधांचे वाटप
कामगार धोरणाची नितांत गरज
‘फेअर अँड लव्हली’ नव्हे, आता ‘ग्लो अँड लव्हली’

मुंबईः रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मंगळवारी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या आरोपपत्रात १४० साक्षीदारांची नावे असून त्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)चे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक ऑडिटर, जाहिरातदार, बॅरोमीटर लावणारे ग्राहक व अन्य काही जणांचा समावेश आहे. या ३ वाहिन्यांनी आपल्याला फसवले असा आरोप जाहिरातदारांचा आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अगोदरच रिपब्लिक टीव्हीच्या पश्चिम भागाचे वितरण प्रमुख व दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांसह १२ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही तपासात नोंद केली आहे. या नोंदीवर पुढे आणखी २ हजार पाने आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. यात फॉरेन्सिक व तंत्रज्ञांच्या साक्षी असतील. पोलिसांनी आरोपींचे फोन, लॅपटॉप व त्यांच्या कम्प्युटरमधील संभाषण, ईमेल, मेसेज व अन्य माहिती जप्त केली आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या काहींना अटक होण्याची शक्यता

मुंबई पोलिसांचे एक पथक बंगळुरात दाखल झाले असून ते रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य संचालक अधिकारी प्रियंका मुखर्जी यांना अटक करण्याच्या तयारीत आहे. प्रियंका मुखर्जी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकेविरोधात याचिका दाखल केली आहे.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी व अन्य वरिष्ठ कार्यकारी संपादक अभिषेक कपूर यांचे जबाबही नोंद केले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: