ट्विटरचा भारताच्या राजकारणात हस्तक्षेपः राहुल गांधी

ट्विटरचा भारताच्या राजकारणात हस्तक्षेपः राहुल गांधी

नवी दिल्लीः काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे काही नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद झाल्याने शुक्रवारी ट्विटरविरोधात मोठ्या

जम्मू-काश्मीर: पीएम केअर फंडातील १६५ व्हेंटिलेटर खराब
आंदोलनाच्या तयारीत धनगर समाज
न्यायाधीश मृत्यू: सीबीआय अहवालावर सुप्रीम कोर्टाची टीका

नवी दिल्लीः काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे काही नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद झाल्याने शुक्रवारी ट्विटरविरोधात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांकडून मोहीम उघडण्यात आली. या मोहिमेत ट्विटर ही अमेरिकी कंपनी भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करत असून ती केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार काम करत असल्याचे थेट आरोप राहुल गांधी ट्विटरवर केला. ट्विटरने आपले खाते बंद करून भारताच्या लोकशाहीच्या मुळावर हल्ला केला आहे. माझे ट्विटर खाते बंद करून ट्विटर भारताच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करत आहे. ही कंपनी भारताच्या राजकारणाच्या चौकटी निश्चित करत आपला व्यवसाय करत आहे. एक राजकीय नेता म्हणून हे आपल्याला पसंत नसल्याचे मत राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आपले खाते बंद करणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. मीडियावर सरकारचे नियंत्रण आहे. आम्हाला ट्विटरवर व्यक्त होण्याचा, विचार ठेवणे हा आशेचा किरण वाटत होता पण ते आता दिसत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

ट्विटरचा हा माझ्यावर हल्ला नाही तर देशाच्या लोकशाही मुळावर हल्ला असून माझे ट्विटरवर सुमारे १ कोटी ९० लाख ते २ कोटी फॉलोअर आहेत, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार ट्विटरने हिसकावून घेतल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरवर केला.

ट्विटरची कारवाई केवळ अनुचित नाही तर ती स्वतःला तटस्थ मंच म्हणण्याच्या विचारसरणीलाही छेद देणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

खाते का बंद केले?

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील नांगल भागातील एका ९ वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी त्या मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली होती व या भेटीचे एक छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले होते. या कारणास्तव ट्विटरने राहुल गांधी यांचे खाते बंद केले होते.

ट्विटरच्या मते राहुल गांधी यांच्या खात्याविरोधात केलेली कारवाई ही नियमानुसार आहे. या अगोदर या स्वरुपाची कारवाई आम्ही अनेक खात्यांवर केली होती व तशी पावले पुढेही उचलली जातील. जे काही झाले आहे ते नियमानुसार विवेकपूर्ण व निष्पक्ष झाले आहे, असा खुलासा ट्विटरने केला आहे. जेव्हा एखादे ट्विट नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि ते खातेधारकाकडून हटवले जात नाही, तेव्हा त्याला ट्विटरकडून नोटीस पाठवण्यात येते व ते खाते बंद केले जाते. जो पर्यंत ते ट्विट हटवले जात नाही तोपर्यंत खातेधारकाच्या तक्रारीवर तोडगा काढता येत नाही, असेही ट्विटरने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0