‘आधार’च्या प्रदर्शनास सरकारकडून अडथळे

‘आधार’च्या प्रदर्शनास सरकारकडून अडथळे

नवी दिल्लीः प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या ओळखीचे प्रमाणपत्र देणार्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' संस्थेने हिंदी चित्रपट ‘आधार’च्या प्

आधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला
सर्व लाभार्थींची नावे आधार कार्डशी जोडणार
गृहखात्याने एनपीआरमध्ये आधार क्रमांकाचीही अट घातली होती

नवी दिल्लीः प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या ओळखीचे प्रमाणपत्र देणार्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ संस्थेने हिंदी चित्रपट ‘आधार’च्या प्रदर्शनात अडथळे निर्माण केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुमन घोष यांनी ही माहिती दिली. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने हा चित्रपट आपल्या मोहिमेच्या विरोधात असल्याचा पवित्रा घेत चित्रपटात २८ ठिकाणी बदल सूचवले आहेत.

वास्तविक हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने २०१९मध्ये प्रदर्शित करण्यास परवानगी दिली होती व तो या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण तो प्रदर्शित होण्याआधी एक आठवडा ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने काही आक्षेप घेत रोखून धरला.

‘आधार’ चित्रपटात एक संवाद ‘मै आधार हूँ,’ असा आहे. यावर यूआयडीएआयने आक्षेप नोंदवत हा संवाद आधार योजनेचा अवमान करत असल्याचा दावा केला.

त्याच बरोबर या चित्रपटात एका प्रसंगात एक व्यक्ती आपल्या खासगी आयुष्यात ‘आधार’ कार्डकडून घुसखोरी होतीय का, अशी चिंता व्यक्त करत सरकार आता आमच्या बाथरूममध्ये घुसणार का, असा प्रश्न विचारते, त्यावरही यूआयडीएआयचा आक्षेप आहे.

एका प्रसंगात एक व्यक्ती बायोमेट्रिक चाचणीत आपला मोतीबिंदू दाखवू नका असे सांगते, त्यावरही यूआयडीएआयचा आक्षेप आहे.

हे आक्षेप का आहेत, याचा खुलासा अद्याप संस्थेने केलेला नाही. हे प्रसंग ‘आधार’ योजनेला बदनाम करणारे प्रयत्न असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे पण त्या संदर्भात अधिक कोणताही खुलासा यूआयडीएआयने केलेला नाही.

यूआयडीएआयच्या या आडमुठ्या कारभारावर दिग्दर्शक सुमन घोष यांनी आश्चर्य व्यक्त करत या चित्रपटाचे भवितव्य काय असेल याची आपल्याला कल्पना नाही अशी खंतही व्यक्त केली. सरकारमधील योग्य व्यक्तीने हा चित्रपट पाहिला तर त्यांना हा चित्रपट ‘आधार’ योजनेच्या समर्थनासाठी बनवला गेला आहे, याची खात्री पटेल, असे घोष म्हणतात.

‘आधार’ चित्रपट झारखंडमधील फरसुआ नावाच्या एका काल्पनिक व्यक्तीवर आधारित आहे. ‘आधार क्रमांक’ मिळाल्यानंतर आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होण्याची स्वप्न त्याला पडतात व त्या निमित्ताने आसपासच्या लोकांमध्ये आधार क्रमांक काढण्यात काय अडथळे येत असतात, याचा वेध घेणारा हा चित्रपट आहे.

फरसुआची भूमिका ‘मुक्काबाज’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचा नायक विनीत कुमार सिंह या केली असून या चित्रपटाचे निर्माते जिओ स्टुडिओ व दृश्यम फिल्म्स हे दोघे आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0