ब्रिटनकडून विजय मल्ल्या दिवाळखोर घोषित

ब्रिटनकडून विजय मल्ल्या दिवाळखोर घोषित

लंडनः ब्रिटनमधील एका न्यायालयाने आर्थिक घोटाळ्यामुळे परागंदा झालेले भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांना दिवाळखोर घोषित केले आहे. ब्रिटनमधील न्यायालयाच

आता धास्ती ‘बी वन वन सेव्हन’ची!
विदुषकांच्या हाती जगाची दोरी
जीडीपीचा अन्वयार्थ: म्हणे, भारताने इंग्लंडला मागे सारले

लंडनः ब्रिटनमधील एका न्यायालयाने आर्थिक घोटाळ्यामुळे परागंदा झालेले भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांना दिवाळखोर घोषित केले आहे. ब्रिटनमधील न्यायालयाच्या या निर्णयामुळे बंद पडलेल्या किंगफिशर एअऱलाइन या मल्ल्या यांच्या विमान कंपनीवरच्या जप्तीची प्रक्रिया भारतीय स्टेट बँकेच्या दृष्टीने कमी अडथळ्यांची होणार आहे. किंगफिशर एअरलाइन कर्जाची परतफेड करता न आल्याने बंद पडली आहे.

६५ वर्षांचे विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये जामीनावर असून त्यांच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत न्यायालयाच्या या निर्णयानंतर एक अडथळा दूर झाला आहे.

मल्ल्या यांच्या वकिलांनी दिवाळखोर घोषित करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी न्यायालयाला विनंती केली पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.

विजय मल्ल्या २०१६ मार्चमध्ये लंडनला फरार झाले व तिथे त्यांनी शरणागती पत्करली. किंगफिशर एअरलाइनचे कर्ज न फेडल्यामुळे ते फरार झाले होते. मल्ल्या यांच्या कंपन्यांनी सुमारे ९ हजार कोटी रु.चा कर्जघोटाळा केल्याचा व हवाला मार्केटचा वापर करून परदेशात पैसे वळवल्याचा आरोप आहे.

२००४ ते २०१२ या काळात किंगफिशर एअरलाइन्सने १७ बँकांकडून सुमारे ७,८०० कोटी रु.चे कर्ज घेतले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1