नवी दिल्लीः कोरोनोमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारतदौरा रद्द करण्यात आला आहे. ते येत्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेले होते. ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची साथ उफाळून आल्याने आपण आपला दौरा रद्द करत असल्याचा खेद बोरिस जॉन्सन यांनी प्रकट केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून चर्चा करून आपल्या निर्णयाची माहिती दिली.
ब्रिटनमध्ये सोमवारी रात्री पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. अशा परिस्थितीत देशात राहणे बोरिस जॉन्सन यांना गरजेचे असल्याचे डाउनिंग स्ट्रीट स्थित जॉन्सन यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.
मूळ बातमी
COMMENTS