युरोपने मदत केली नसल्याने युक्रेन हतबल

युरोपने मदत केली नसल्याने युक्रेन हतबल

रशियाच्या फौजा युक्रेनमध्ये पोहचल्यानंतरही युरोपमधील अनेक देशांनी आपल्याला या संघर्षापासून दूर ठेवले, रशियाला उत्तरही दिले जात नसल्याबद्दल युक्रेनचे अ

कप्पन यांची हमी घेण्यासाठी उभ्या राहिल्या ७९ वर्षीय शिक्षणतज्ज्ञ
मोदींची उघडलेली मूठ…अर्थात संघ काय करणार?
बंगळुरू दंगलः एसडीपीआय संघटनेची चौकशी सुरू

रशियाच्या फौजा युक्रेनमध्ये पोहचल्यानंतरही युरोपमधील अनेक देशांनी आपल्याला या संघर्षापासून दूर ठेवले, रशियाला उत्तरही दिले जात नसल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी हतबलता व्यक्त केली. शुक्रवारी राजधानी कीव येथील आपल्या कार्यालयातून त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सैन्याचा गणवेशही परिधान केला होता. युक्रेनच्या नागरिकांना त्यांनी हाती शस्त्र घ्यावे असेही सांगितले.

जेलेन्स्की म्हणाले, रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये घुसले त्या अगोदर युरोपिय नेत्यांनी वेगाने पावले उचलली असती तर हे आक्रमण झाले नसते. रशियाचे आक्रमण हा दुसऱ्या महायुद्धासारखे असून युरोपीय नेत्यांनी साधलेल्या मौनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जेलेन्स्की यांनी युरोपमधल्या नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने करावीत व आपल्या देशाच्या नेत्यांना निर्णायक कारवाई करण्यासाठी दबाव आणावा असेही आवाहन केले.

रशियाचे आक्रमण सगळे जग पाहात आहे. युक्रेनला सर्वांच्या मदतीची गरज आहे. पण युक्रेनला मदत मिळताना विलंब होत आहे. या विलंबात स्वतःचा बचाव कसे करू शकू असा सवाल जेलेन्स्की यांनी उपस्थित केला आहे.

जेलेन्स्की यांनी रशियाच्या आक्रमणाविरोधात जगाने पावले उचलावी म्हणून शुक्रवारी अनेक देशाच्या प्रमुखांना दूरध्वनी करत रशियावर तातडीने निर्बंध घालावेत अशी विनंती त्यांनी केली आहे.

युक्रेनला दमनशाहीतून मुक्त करण्यासाठी कारवाई

दरम्यान रशियाची युक्रेनवरची कारवाई ही सामान्य युक्रेनवासियांना दमनशाहीतून मुक्त करण्यासाठी केली आहे, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोफ यांनी केले आहे. युक्रेनचे भविष्य ठरवण्याचा अधिकार युक्रेनच्या सामान्य नागरिकाला आहे, रशिया अशा कठीण प्रसंगी स्वस्थ बसू शकत नाहीत. युक्रेनमध्ये लोकशाही येईल अशी शक्यताही दिसत नव्हती. युक्रेनवर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा नाही असेही लावरोफ यांनी स्पष्ट केले. युक्रेनचे संपूर्ण निःशस्त्रीकरण्यासाठी आमची कारवाई असल्याचेही लावरोफ यांनी सांगितले.

लावरोफ यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांचे युगोस्लाव्हिया, इराक, लिबिया व अन्य देशांवरचे हल्ले योग्य होते का असाही सवाल केले. या देशांमध्ये लोकशाही नसल्याचे सांगत हजारो सामान्य माणसे ठार मारली गेली होती, याचाही संदर्भ लावरोफ यांनी दिला.

रशियाचे ४५० सैनिक मारले गेल्याचा ब्रिटनचा दावा

रशियाने युक्रेनवर केलेल्या कारवाईदरम्यान रशियाचे ४५० हून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी केला आहे. युक्रेनमधील एक महत्त्वाचे विमानतळ रशियाच्या सैनिकांना हवे होते पण ते काबीज करण्यात त्यांना अपयश आल्याचा दावाही वॉलेस यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: