‘नोटबंदीमुळेच वाढले बेरोजगारीचे संकट’

‘नोटबंदीमुळेच वाढले बेरोजगारीचे संकट’

तिरुवनंतपुरमः २०१६मध्ये कोणताही विचार न करता व धोके लक्षात न घेता जनतेवर लादलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची

काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?
कॅगचे माजी महासंचालक विनोद राय यांचा माफीनामा
‘सुडाचे राजकारण सोडून तज्ज्ञांचे सल्ले घ्या’

तिरुवनंतपुरमः २०१६मध्ये कोणताही विचार न करता व धोके लक्षात न घेता जनतेवर लादलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी मोदी सरकारवर केली. डॉ. सिंग यांनी केंद्र व राज्य यांच्यात संवादही नसल्याची खंत बोलून दाखवली. केरळमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलमेंट स्टडीज या संस्थेच्या ‘प्रतिक्षा २०३०’कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. सिंग म्हणाले, २०१६मध्ये कोणताही सारासार विचार न करता व धोक्यांची कल्पना न करता मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेत असंघटित क्षेत्राला जबर धक्का दिला. या धक्क्यातून हे क्षेत्र अद्याप सावरलेले नसून बेरोजगारीचा हा वाढलेला दर नोटबंदी निर्णयाची निष्पत्ती आहे. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकांचे पतधोरण समस्यांचे असून त्याचा फायदा लघु व मध्यम क्षेत्राला मिळत नसल्याचेही ते म्हणाले.

संघराज्य प्रणाली व राज्यांशी सततचा संवाद हा भारताच्या घटनेत नमूद करण्यात आला आहे. ही मूल्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा व राजकीय तत्वज्ञानाचा पाया आहे. सध्याच्या सरकारला राज्यांशी संवाद साधण्यात फारसे स्वारस्य वाटत नाही, अशी खंत डॉ. सिंग यांनी व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: