उ. प्रदेशात धर्मांतरणास फूस देणाऱ्यांवर रासुका

उ. प्रदेशात धर्मांतरणास फूस देणाऱ्यांवर रासुका

लखनऊः धर्मांतरण प्रकरणात सामील असलेल्या आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) व उ. प्रदेश गुन्हेगारी (प्रतिबंधित) कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल व

धर्म ही अफूची गोळी?
‘९ मे रोजी रशिया युक्रेनशी युद्धाची घोषणा करेल’
आरसेपचा धोका टळला, पण बाकी समस्यांचे काय?

लखनऊः धर्मांतरण प्रकरणात सामील असलेल्या आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) व उ. प्रदेश गुन्हेगारी (प्रतिबंधित) कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल व संबंधित आरोपींची संपत्ती जप्त करून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाईल, असा निर्णय उ. प्रदेश सरकारने घेतला आहे. तसे निर्देश सरकारने दहशतवादविरोधी कृती दल (एटीएस) व पोलिसांना दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सुमारे हजार जणांच्या धर्मांतरणाच्या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप ठेवत मुफ्ती काजी जहांगीर कासमी व मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. या दोघांनी अन्य काही जणांच्या मदतीने इस्लामिक देवाह सेंटर सुरू केल्याचा आरोप पोलिसांचा आहे. इस्लामिक देवाह सेंटर हे धर्मांतरणासाठी वापरले जाते असे पोलिसांचे म्हणणे आहे. मोहम्मद उमर गौतम याने १९८०च्या दशकात इस्लाम धर्म स्वीकारला होता.

मंगळवारी या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

दरम्यान इस्लामिक देवाह सेंटरकडून महिला, बेरोजगार, गरीब, शारीरिकदृष्ट्या विकलांगांचे धर्मांतर केले जाते असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: