फिरोजाबादः उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये गेल्या आठवड्याभरात डेंग्यूसदृश तापामुळे ४० जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ३२ मुलांचा समावेश आहे. सरकारने
फिरोजाबादः उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये गेल्या आठवड्याभरात डेंग्यूसदृश तापामुळे ४० जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ३२ मुलांचा समावेश आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत फिरोजाबाद शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता नीता कुलश्रेष्ठ यांची बदली अलीगड येथे शासकीय रुग्णालयात सल्लागार म्हणून केली आहे. तर सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद शासकीय रुग्णालयाला भेट देऊन अधिकार्यांशी चर्चा केली व या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेसंदर्भात आग्रा विभागीय आयुक्त अमित गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णांमध्ये आढळलेला ताप डेंग्यू सदृश असून तापाची कारणे शोधली जात आहेत. अनेक रुग्णांच्या रक्तातल्या प्लेटलेट्स कमी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हा ताप साथीचा ताप वाटत आहे. या पूर्वी काही रुग्णांचे मृत्यू टायफसनेही झाल्याचे निदान झाले आहे.
या डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण गेल्या रक्षाबंधन सणापासून वाढू लागले आहेत. पण या तापाचे रुग्ण नजीकचे जिल्हे आगरा किंवा मैनपुरी या जिल्ह्यांत अद्याप आढळले नसल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गेल्या मंगळवारी फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमध्ये २१० मुलांना भरती करण्यात आले होते. मुलांना अतिसार, उलट्या होत होत्या. त्यातील २३ मुलांना डेंग्यूचे निदान झाले. अन्य मुलांवर लक्ष ठेवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मूळ बातमी
COMMENTS