वृत्तपत्रात मांस विकल्याप्रकरणी अटक व्यक्तीवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप

वृत्तपत्रात मांस विकल्याप्रकरणी अटक व्यक्तीवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप

चिकन दुकानाचा मालक तालिब हुसेन याला देव-देवतांच्या प्रतिमा असलेल्या वर्तमानपत्रात चिकन गुंडाळून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हुसैनने त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या टीमवर चाकूने हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर त्याच्या वकिलाने त्याला फसवले जात असल्याचे सांगितले.

हेमंत नगराळे नवे पोलीस महासंचालक
‘रफाल’ आणि राजनय
१ ऑक्टोबरलाही रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथील एका चिकन दुकानाचा मालक तालिब हुसैन याला हिंदू देवतांची चित्रे असलेल्या जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेले मांस विकल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

वृत्तानुसार, यानंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी दावा केला आहे, की हुसैनने त्याला पकडण्यासाठी आलेल्या टीमवर चाकूने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा आरोप खोटा असल्याचे त्याचे कुटुंबीय आणि वकिलांचे म्हणणे आहे.

तालिबच्या अटकेनंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मंडळ अधिकारी जितेंद्र कुमार यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांचा उल्लेख केला पण ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याच्या आरोपावर ते काहीही बोलले नाही.

रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी, तालिबवर भारतीय दंड संहिता कलम १५३ अ (शत्रुत्वाला चालना देणे), २९५ अ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने पूजास्थळाचे नुकसान करणे अपवित्र करणे), ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हिंदू जागरण मंचचे जिल्हा प्रमुख कैलाश गुप्ता यांनी हुसैनने वृत्तपत्रात गुंडाळलेले चिकन विकल्याची तक्रार दाखल केली होती.

हुसैन यांच्या मुलाने ‘द वायर’ला सांगितले की, जुन्या वृत्तपत्रांमध्ये गोष्टी गुंडाळणे ही एक सामान्य प्रथा असल्याने काय चूक झाली याची त्यांना कल्पना नाही.

तो म्हणाला, ‘पोलिसांनी परवा माझ्या वडिलांना उचलले आणि काल (सोमवार) त्यांना तुरुंगात पाठवले. त्यांचा गुन्हा काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्ही गेल्या २० वर्षांपासून एक दुकान चालवत आहोत, आम्ही बाजारातून वर्तमानपत्र खरेदी करतो आणि त्यात सामान पॅक करून विकतो.

हुसेनचे वकील दानिश म्हणाले की, त्यांच्या अशिलाला गोवले जात आहे. ते म्हणाले, “हे आरोप निराधार आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली आरोप ठेऊन त्यांना गोवण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: