बायडन हेच अध्यक्ष; अमेरिकी काँग्रेसचे शिक्कामोर्तब

बायडन हेच अध्यक्ष; अमेरिकी काँग्रेसचे शिक्कामोर्तब

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये बुधवारी अमेरिकेची संसद ‘कॅपिटल’मध्ये ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या हैदोसानंतर बुधवारी रात्री अमेरिकी काँग्रेसने अमेरिके

इसिसचा म्होरक्या अबू-बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार
अमेरिका-इराण संघर्षात भारताचा बळी
बरं झालं, डॉनल्ड ट्रम्प हरले!

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये बुधवारी अमेरिकेची संसद ‘कॅपिटल’मध्ये ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या हैदोसानंतर बुधवारी रात्री अमेरिकी काँग्रेसने अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन व उपाध्यक्षपदी कमला हॅरीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तर ट्रम्प यांनी २० जानेवारीला सत्ता सोडण्याचे संकेत दिले आहेत.

अखेरच्या मतमोजणीत बायडन यांना ३०६ इलेक्टोरल मते तर एकूण ८ कोटी मते मिळाल्याचे अमेरिकी काँग्रेसने जाहीर केले.

बायडन यांच्या नावावर काँग्रेसचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनातील कर्मचार्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या कार्यालयाच्या प्रमुख स्टीफनी ग्रीसम, व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव सारा मॅथ्यूज यांनी राजीनामे दिले. तर व्हाइट हाउसच्या सामाजिक मंत्री रिकी निसेटा यांनी ट्रम्प समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचा निषेध करत राजीनामा दिला.

वॉशिंग्टनमध्ये १५ दिवसांची आणीबाणी

वॉशिंग्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारात ४ जण ठार झाले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. ही महिला अमेरिकेच्या लष्करात सामील होती व नंतर ती निवृत्त झाली होती. बुधवारी उशीरा पोलिसांनी ट्रम्प समर्थकांना कॅपिटल इमारतीतून हुसकावून लावले. त्यावेळी अनेक समर्थकांकडे बंदुकाबरोबर अन्य घातक शस्त्रास्त्रे होती. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून राजधानी वॉशिंग्टनमध्ये १५ दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आणीबाणी घोषित करूनही शेकडो ट्रम्प समर्थक रस्त्यावरून हटत नव्हते.

ट्रंप यांचे सोशल अकाऊंट ब्लॉक

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी सकाळी जाहीर केले, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यास बंदी घातली जाईल.

झुकरबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “आमचा विश्वास आहे की या काळात राष्ट्रपतींना आमच्या सेवेचा वापर चालू ठेऊ देण्याची जोखीम खूप मोठी असेल. म्हणूनच, आम्ही त्याच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर अनिश्चित काळासाठी किंवा  कमीतकमी पुढील दोन आठवड्यांपर्यंत सत्तेचे शांततेत हस्तांतरण  पूर्ण होईपर्यंत बंदी घालत आहोत.”

गुरुवारी बंदी घालण्यापूर्वी ट्रम्प पुढील २४ तास फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करू शकणार नाहीत असे फेसबुकने सुरुवातीला बुधवारी सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0