जॉर्ज फ्लॉइड हत्याप्रकरणात पोलिसास २२ वर्षांची शिक्षा

जॉर्ज फ्लॉइड हत्याप्रकरणात पोलिसास २२ वर्षांची शिक्षा

मिनियापोलिसः अमेरिकेच्या पोलिस व्यवस्थेत खोलवर मुरलेला वंशभेद उघड करणारी कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड (४६) यांच्या हत्येतील मुख्य आरोपी व मिनियोपिल

दोन खुराकांमधील विलंब; सरकारचा परस्पर निर्णय
गुजरात : गोशाळेत कोविड सेंटर; गोमूत्राचा उपचार
एलआयसी आयपीओ गाथा: सुरुवातीपासून शेवटपर्यंत निराशा

मिनियापोलिसः अमेरिकेच्या पोलिस व्यवस्थेत खोलवर मुरलेला वंशभेद उघड करणारी कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड (४६) यांच्या हत्येतील मुख्य आरोपी व मिनियोपिलस पोलिस खात्यातील एक अधिकारी डेरेक चॉविन (४५) याला २२ वर्षे ६ महिन्याचा कारागृहवास शुक्रवारी सुनावण्यात आला.

गेल्या वर्षी मे महिन्यात मिनियापोलिस येथील एका दुकानात बनावट नोट खपवल्याच्या संशयावरून डेरेक चॉविन या पोलिसाने जॉर्ज फ्लॉइडला ताब्यात घेतले होते.

पण चॉविन याने फ्लॉइडला केवळ ताब्यात घेतले नाही तर भर रस्त्यावर त्यांच्या गळ्यावर आपला गुडघा रेटून त्यांना ९ मिनिटाहून अधिक काळ दाबून ठेवले होते. यामुळे फ्लॉइड गुदमरले. ‘मला श्वास घेता येत नाहीये’ (I Can’t Breath) असे फ्लॉइड सातत्याने चॉवेन याला सांगत होते. पण चॉवेन यांनी फ्लॉइड यांच्या गळ्यावर रेटून धरलेला आपला गुडघा काढला नाही. त्यामुळे काही वेळाने फ्लॉईड यांचा गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेत काळे विरुद्ध गोरे अशा वंशभेद उफाळून आला. देशात ठिकठिकाणी लाखो, हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. या मोर्चांत सर्व वंशाचे नागरिक सामील झाले होते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्याने तत्कालिन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृष्णवर्णियांच्या हक्काच्या विरोधात भूमिका घेत कट्टर गोर्यांना आपला पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांनी पोलिसांच्या विरोधातही थेट भूमिका घेतली नव्हती. ट्रम्प यांच्या अशा भूमिकेमुळे अमेरिकेत वंशभेदावरची फूट दिसून आली व त्याचा फटका त्यांना पुढे झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत बसला.

चॉवेन याला कमीत कमी ३० वर्षांची शिक्षा व्हावी अशी मागणी फ्लॉइड यांच्या कुटुंबियांची होती. पण शिक्षा २२ वर्षांची सुनावल्याने फ्लॉइड यांचे कुटुंबिय नाराज झाले आहेत.

पण अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत एकाही पोलिस अधिकार्याला एवढ्या प्रदीर्घ काळाचा तुरुंगवास सुनावण्यात आलेला नाही.

चॉवेन याचे कारागृहातील वर्तन चांगले राहिल्यास त्याची १५ वर्षानंतर पॅरोलवर सुटका होऊ शकते.

गेल्या एप्रिलमध्येच मिनियापोलिसच्या १२ सदस्यांच्या न्यायाधीश मंडळाने चॉविन याला सर्व आरोपांखाली दोषी ठरवले होते. त्याच्यावर मानवी हत्या, पोलिस अधिकारांचे उल्लंघन असे आरोप ठेवण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0