ट्रम्प-बायडेनमध्ये कमालीची चुरस

ट्रम्प-बायडेनमध्ये कमालीची चुरस

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांत डेमोक्रेट्सचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार व सध्याचे अमेरिकेचे

जनमताची भाषा (लेखमालेतील अंतिम भाग)
इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का?
ट्रंप यांचा ट्वीटखेळ

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांत डेमोक्रेट्सचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार व सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर किंचित आघाडी घेतली आहे. पण ज्या बॅटल ग्राउंड स्टेटमध्ये दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे, तेथे ट्रम्पच्या टीमने विविध खटले दाखल केले आहेत. मतमोजणी मंदगतीने व्हावी, त्यामध्ये अडथळे निर्माण व्हावेत म्हणून हे न्यायालयीन खटले ट्रम्प यांनी दाखल केले आहेत. अशा खटल्यामुळे बायडेन अध्यक्षपदापासून दूर राहावेत हा उद्देश आहेच, पण काही राज्यात दाखल केलेले खटले हास्यास्पद असल्याचे काही विधिज्ञांचे म्हणणे आहे.

पेनसिल्व्हेनियात रिपब्लिकन पक्षाने नियुक्त केलेल्या एका न्यायाधीशाने असे खटले तग धरू शकणार नाहीत, असेही विधान केले आहे. पण ट्रम्प यांच्या निवडणूक निरीक्षकांनी मतमोजणी प्रक्रिया पाहावी असे न्यायालयाने सांगितले आहे. तर फिलाडेल्फियातल्या मतमोजणीत कोणताही घोटाळा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान बायडेन यांनी २६४ इलेक्टोरल मते तर ट्रम्प यांनी २१४ इलेक्टोरल मते मिळवल्याचे वृत्त अल-जझिराने दिले आहे. यात अलास्का, जॉर्जिया, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना व पेनसिल्व्हेनिया या राज्यातील मतमोजणी अद्याप सुरू असून त्यांचे निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. अरिझोना येथील सुमारे पावणे चार लाख मते मोजायची बाकी आहेत पण असोसिएट प्रेसने हे राज्य बायडेन यांनी घेतल्याचे म्हटले आहे.  बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर ६८ हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे व ही टक्केवारी २.३५ टक्के इतकी आहे.

ट्रम्प जॉर्जियामध्ये किंचित पुढे आहेत. या राज्यातील ६० हजाराहून मतांची मोजणी अद्याप झालेली नव्हती.

तर अरिझोना राज्यात साडेचार लाख मतमोजणी बाकी आहे.

पेनसिल्व्हिनिया (२० इलेक्टोरल मते), जॉर्जिया (२०), नॉर्थ कॅरोलिना (१५), नेवाडा (६) यापैकी एका राज्यातील इलेक्टोरल मते बायडेन यांना मिळाल्यास ते अमेरिकेचे नवे अध्यक्ष होऊ शकतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0