बायडन यांच्याकडे सूत्रे देण्यास ट्रम्प तयार

बायडन यांच्याकडे सूत्रे देण्यास ट्रम्प तयार

वॉशिंग्टनः अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांना अध्यक्षीय पदाची सूत्रे हस्तांतरीत करण्याच्या सूचना डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकार्यांना सोमवारी दिल

विदुषकांच्या हाती जगाची दोरी
२२ हजार भारतीयांचे अमेरिकेकडे शरणागतीचे अर्ज
प्लीज – माझा श्वास कोंडतोय..

वॉशिंग्टनः अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांना अध्यक्षीय पदाची सूत्रे हस्तांतरीत करण्याच्या सूचना डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकार्यांना सोमवारी दिल्या. अध्यक्षीय सत्ता हस्तांतरणाची जबाबदारी जनरल सर्विसेस अडमिनिस्ट्रेशनकडे असते. या संस्थेच्या प्रमुखांनी बायडन यांना व्हाइट हाउसमध्ये येण्यासाठी पत्र पाठवले. त्यानंतर ट्रम्प यांनी आपला विरोध कमी करत नव्या सरकारकडे सूत्रे सोपवण्याच्या आपल्या अधिकार्यांना सूचना दिल्या. पण ट्रम्प यांनी आपली लढाई सुरूच राहील व विजय मिळेल, अशा वल्गनाही करणे सुरूच ठेवले आहे.

दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष बायडन यांनी आपले मंत्रिमंडळ बनवण्यास सुरूवात केली आहे. बायडन यांच्याकडून नवे परराष्ट्र मंत्री म्हणून अँटनी ब्लिंकेन यांची नियुक्ती करण्याची शक्यता असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जेक सुलिव्हन यांच्याकडे जबाबदारी जाऊ शकते.

ओबामा प्रशासनात ब्लिंकेन हे उपपरराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत होते. तर बायडन यांच्या निवडणूक प्रचारात ते परराष्ट्र धोरण सल्लागार म्हणून कार्यरत होते.

बायडन यांच्याकडून अमेरिकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून फेडरल रिझर्व्हच्या माजी प्रमुख जेनेट येलेन यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचीही वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. येलेन या ७४ वर्षांच्या असून सध्या त्या ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहे. २०१४ ते २०१८ या दरम्यान त्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख होत्या तर १९९७ ते १९९९ या काळात त्या व्हाइट हाउसच्या आर्थिक सल्लागार समितीच्या संचालक होत्या.

अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून आफ्रिकन अमेरिकन लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड या महिलेची नियुक्ती होणार असून अलजांदेरो मेयोरकास हे होमलँड सिक्युरिटीचे नवे प्रमुख असतील. तर अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालक म्हणून अव्हरिल हेन्स या महिला अधिकार्याच्या नियुक्तीची शक्यता आहे. अमेरिकेच्या इतिहासात गुप्तचर खात्याच्या प्रमुखपदी एखाद्या महिलेची ही पहिलीच नियुक्ती असेल.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0