महाभियोग आरोपांमधून ट्रम्प मुक्त

महाभियोग आरोपांमधून ट्रम्प मुक्त

रिपब्लिकन सदस्य मिट रॉमनी यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले.

अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटनांकडून १,२२७ कोटींच्या देणग्या
ट्रम्प आणि ‘चौघीजणी’
हाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका

अमेरिकन सिनेट सदस्यांनी बुधवारी महाभियोग आरोपांमधून ट्रम्प यांना मुक्त करण्याच्या बाजूने मतदान केले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या ट्रम्प यांच्या व्यवहारांसाठी महाभियोग लावण्यात आला होता.

माजी यूएस उपाध्यक्ष आणि २०२० निवडणुकीतील संभाव्य विरोधक जो बिदेन आणि त्यांचा मुलगा हंडर यांची चौकशी करण्यासाटी झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आणि त्या चौकशीची घोषणा करेपर्यंत युक्रेनची काँग्रेसने मंजूर केलेली मदत रोखून ठेवल्याचा अमेरिकन अध्यक्षांवर आरोप होता.

मतदान बहुतांशी पक्षांनुसार झाले. रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सभागृहाने ५२ विरुद्ध ४८ मतांनी ट्रम्प यांना सत्तेचा दुरुपयोग या पहिल्या आरोपातून मुक्त केले. उटाहचे सिनेटर मिट रॉमनी यांनी या बाबतीत ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले आणि ते खटल्याच्या अंतिम टप्प्यात पक्षाचा आदेश मोडणारे एकमेव रिपब्लिकन सदस्य ठरले.

काँग्रेसच्या कामात अडथळा हा दुसरा आरोपही रॉमनीसह सर्व ५३ सदस्यांनी ‘अपराधी नाही’ म्हणून मतदान केल्याने फेटाळला गेला. डेमोक्रॅट पभाला ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी १०० जागांपैकी दोन तृतियांश मते मिळणे आवश्यक होते.

मुक्तता ‘अर्थहीन’: डेमोक्रॅटिक पक्ष

डेमोक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ सिनेट सदस्य चक शूमर यांनी रिपब्लिकन पक्षाने खटल्यामध्ये नवीन साक्षीदारांची सुनावणी ऐकण्यासच नकार दिल्यामुळे ट्रम्प यांची मुक्तता अर्थहीन असल्याची टिप्पणी केली. न्यू यॉर्कच्या सिनेटरनी वार्ताहरांना सांगितले:“रिपब्लिकनांनी न्यायपूर्ण खटला नाकारला असल्यामुळे अध्यक्षांच्या मुक्ततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.”

“कोणत्याही तथ्यांविना, न्याय्य खटल्याविना त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. आणि याचा अर्थ असा की त्यांची मुक्तता अर्थहीन आहे,” असेही शूमर म्हणाले. त्यांनी अनेक ट्वीटमधून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

त्या शिवाय, सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, ट्रम्प हे “अमेरिकन लोकशाहीला असलेला धोका आहेत.”

“आज अध्यक्ष आणि सिनेटमधील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी कायद्याचा अभाव हेच सामान्य असल्याचे दाखवले आहे आणि आपल्या राज्यघटनेतील नियंत्रण आणि संतुलनाची व्यवस्था नाकारली आहे,” असे पेलोसी यांनी मुक्ततेनंतरच्या एका निवेदनात म्हटले आहे.”

रॉमनी यांनी सिनेटमध्ये ट्रम्प यांचा धिक्कार केला

बुधवारी रिपब्लिकन रॉमनी यांनी सिनेटमध्ये ट्रम्प यांना “आपले निवडणुकीचे अधिकार, आपली राष्ट्रीय सुरक्षा आणि आपल्या मूलभूत मूल्यांवर मोठा आघात केल्याचा” आरोप करत धिक्कारले होते.

रॉमनी यांनी २०१२ मध्ये बराक ओबामा यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मागच्या शुक्रवारी महाभियोगाच्या खटल्यामध्ये नवीन पुरावे आणि साक्षींची सुनावणी करण्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या दोन रिपब्लिकनांपैकी रॉमनी हे एक आहेत.

ट्रम्प यांनी एका व्हिडिओमध्ये रॉमनी यांना डळमळीत मते असणारे आणि विश्वासघातकी म्हणत त्यांच्या या कृतीवर तीव्र टीका केली.

ट्रम्प ‘4EVA’?

ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा हा महाभियोग म्हणजे त्यांच्या विरोधातील “कारस्थान” छळ आणि धर्मयुद्ध असल्याचे म्हटले आहे.

मतदानानंतर काही मिनिटांमध्येच, ट्रम्प यांनी २०२४ सालासाठीच्या त्यांच्या स्वतःच्या मोहिमेच्या लोगोने सुरुवात करणारा आणि ट्रम्प 4EVA असा शेवट असणारा व्हिडिओ टाकला. ट्रम्प यांना कायद्यानुसार दोनच वेळा अध्यक्ष होता येते, म्हणजेच ते जर येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकले तर त्यांना पुन्हा २०२४ मध्ये निवडणूक लढवता येणार नाही.

त्यांनी नंतर सांगितले, ते त्यांच्या मुक्ततेबद्दल व्हाईट हाऊसमधून निवेदन प्रसिद्ध करतील.

या मुक्ततेचा उपयोग ते त्यांच्या निवडणूक मोहिमेमध्ये करतील अशी शक्यता असल्याचे डीडब्ल्यूचे अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील प्रतिनिधी ऑलिव्हर सॅलेट यांनी सांगितले.

प्रतिनिधींच्या सभागृहात महाभियोग खटला चालवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे पहिले अध्यक्ष म्हणून नोव्हेंबरमध्ये ट्रम्प मतदानाला सामोरे जातील.

अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंतच्या अडीचशे वर्षात महाभियोगाचा खटला दाखल होणारे ट्रम्प हे तिसरेच अध्यक्ष आहेत. १८६८ मध्ये अँड्र्यू जॉन्सन आणि १९९८ मध्ये बिल क्लिंटन हे यापूर्वी खटल्याला सामोरे गेले होते. आजवर अशा महाभियोगामध्ये कोणत्याही अध्यक्षाला पदावरून हटवण्यात आलेले नाही. १९७४ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी सभागृहात महाभियोग खटला चालवला जाण्यापूर्वीच राजीनामा दिला होता.

डीडब्ल्यूमधील मूळ लेख.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0