भ्रष्टाचाराचे बिंग फोडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा

भ्रष्टाचाराचे बिंग फोडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजना योजनेंतर्गत मुलांना भाकरीसोबत मीठ देत असल्याचे वृत्त देणाऱ्या पत्

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर
८५ टक्के श्रमिकांनी स्वतःच ट्रेनचे भाडे भरले
लोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजना योजनेंतर्गत मुलांना भाकरीसोबत मीठ देत असल्याचे वृत्त देणाऱ्या पत्रकारावरच सरकारने गुन्हा दाखल केला आहे. हे वृत्त मुद्दामून, पूर्वनियोजित, त्रास देण्यासाठी व सरकारी कामात अडथळे आणण्यासाठी प्रसिद्ध केल्याचा आरोप सरकारचे केला आहे.

२३ ऑगस्टला ‘जनसंदेश टाइम्स’ या वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार पवन जयस्वाल यांनी मिर्झापूर जिल्ह्यातील १०० पटसंख्या असलेल्या एका सरकारी शाळेत माध्यान्ह भोजन योजनेनुसार आठवीतील विद्यार्थ्यांना  भाकरीसोबत मीठ देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओने देशभर खळबळ उडाली होती. या वृत्ताने उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीवर व भ्रष्टाचारावर चोहोबाजूंनी आरोप होऊ लागल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

पण सोमवारी जिल्हाधिकारी अनुराग पटेल यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी पत्रकार पवन जयस्वाल, सरपंच राजकुमार पाल व एका अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल करून या तिघांनी खोटा व्हिडिओ सादर केल्याची तक्रार करत या तिघांविरोधात आयपीसीअंतर्गत १२० ब, १८६, १९३ व ४२० कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: