वाहन बाजारातील मंदीवरून बजाज पिता-पुत्राची सरकारवर टीका

वाहन बाजारातील मंदीवरून बजाज पिता-पुत्राची सरकारवर टीका

मुंबई : अर्थव्यवस्थेला गती आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गेल्या शुक्रवारी कंपनीच्या सार्वजनिक बैठकीत बजाज समुहाचे मुख्य संच

‘त्या’ विधानानंतर अर्थमंत्र्याकडून उद्योजकांशी चर्चा
सूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच!
अर्थखात्याची मनमानी आणि असहाय्य अधिकारी

मुंबई : अर्थव्यवस्थेला गती आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गेल्या शुक्रवारी कंपनीच्या सार्वजनिक बैठकीत बजाज समुहाचे मुख्य संचालक राहुल बजाज व त्यांचे पुत्र आणि कंपनीचे कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी टीका केली. या दोघांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणांवरून सरकार संभ्रम निर्माण करत असल्याचाही आरोप केला.

एकीकडे मागणी नाही व दुसरीकडे खासगी गुंतवणूक नाही अशा परिस्थितीत विकास कुठून आणणार असा सवाल राहुल बजाज यांनी सरकारला केला. विकास हा स्वर्गातून पडत नाही. सध्या वाहन उद्योग अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून कार, व्यावसायिक वाहने व दुचाकींचा व्यवसाय जेमतेम होत असल्याकडे राहुल बजाज यांनी लक्ष वेधले.

भारतातील वाहन उद्योग मोठ्या प्रमाणात मंदीचा सामना करत असून दर महिन्याला वाहनांची विक्रीही खालावत चालली आहे. आपले सरकार खरे सांगो वा खोटे पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक भारतातील वाहन उद्योगाची खालावत चाललेली आकडेवारी गेले तीन-चार वर्षे दाखवत आहे. याकडे कसे दुर्लक्ष करणार असा सवाल करत राहुल बजाज यांनी कोणताही सरकार देश आपल्याकडे ख्याली खुशाली असल्याचा दावा करत असते पण जे वास्तव आहे ते कळाले पाहिजे असे विधान केले.

मध्यंतरी देशातील वाहन उद्योगाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सीयाम) जीएसटीचे दर कमी करण्याबाबत सरकारशी चर्चा केली होती. पण आमच्या मागण्या आजही सरकारने पुऱ्या केलेल्या नाहीत. त्या उलट सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर जोर देत असल्याबद्दल राहुल बजाज यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत नीती आयोगाने २०२५पर्यंत सर्व दुचाकी वाहने व २०२३पर्यंत तिचाकी वाहनांची इंजिन क्षमता १५० सीसी निश्चित करण्याचे ठरवले होते. हा निर्णय अतिशय चांगला होता. पण गेले दोन वर्षे या धोरणावर सरकारकडूनच कोलांटउड्या मारल्या जात आहेत. प्रशासनातून परस्पर छेद देणारी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे वाहन उद्योगात संभ्रम तयार झाल्याबद्दल खेद राहुल बजाज यांनी व्यक्त केला.

या बैठकीत राहुल बजाज यांनी सध्याच्या परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार व्यक्त करत सरकारचे वाहनधोरण विस्कळीत करण्याचा आपला कोणताही उद्देश नाही. कारण हा देश ही एक बाजारपेठ आहे व अशा ९० बाजारपेठ आपल्याला सांभाळायच्या आहेत. पण प्रत्येक देशाच्या सरकारने त्यांची धोरणे बदलत बसल्यास वाहन उद्योगाला स्वत:वर लक्ष देता येणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले.

मूळ बातमी

अधिक माहितीसाठी वाचा – भारतीय वाहन उद्योगाची दशा

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0