विजयाचे श्रेय भिंद्रनवालेंनाः सिमरनजीत मान यांचे वक्तव्य

विजयाचे श्रेय भिंद्रनवालेंनाः सिमरनजीत मान यांचे वक्तव्य

चंडीगढः रविवारी पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकांत पंजाबमधील संगरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिरोमणी अकाली दला (अमृतसर)चे उमेदवार सिमरनजीत सि

‘भीमा-कोरेगाव तपास एनआयएनने करण्यास सरकारची हरकत नाही’
कोविड आणि राजकारण
राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक

चंडीगढः रविवारी पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकांत पंजाबमधील संगरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिरोमणी अकाली दला (अमृतसर)चे उमेदवार सिमरनजीत सिंह मान यांनी आपल्या विजयाचे श्रेय खलिस्तान चळवळीचा प्रणेता व दहशतवादी जर्नैलसिंह भिंद्रनवाले याला दिले आहे. मान यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय व या संघटनेने समर्थन दिलेल्या एका शीख नेत्याचा हवाला देत आमच्या पक्षाचा विजय हा कार्यकर्ते व जर्नेलसिंह भिंद्रनवाले यांनी दिलेल्या शिकवणीचा असल्याचेही विधान केले आहे. दीप सिंह सिद्धू व सिद्धू मूसे वाला यांच्या मृत्यूने शीख समुदाय नाराज आहे, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. रोज मुसलमानांच्या हत्या केल्या जात आहेत. बिहार व छत्तीसगडमध्ये आदिवासींना नक्षलवादी ठरवून मारले जात आहे, हे मुद्दे आपण संसदेत उपस्थित करणार असल्याचे मान यांनी सांगितले.

मान यांच्या विजयावर काँग्रेसची टीका

मान यांच्या विजयानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत संगरूरमध्ये लोकशाहीचा पराभव झाला असून पंजाबला हिंसा व दहशतवादामध्ये ढकलले जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर जयवीर शेरगिल या काँग्रेसच्या प्रवक्त्याने संगरूर पोटनिवडणुकांचे निकाल पंजाबमधील सर्वांसाठी धोक्याचा इशारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारच्या संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत सिमरनजीत सिंह मान यांनी आम आदमी पार्टीचे उमेदवार गुरमेल सिंह यांचा ५,८०० मतांनी पराभव केला. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे संगरूर येथून लोकसभेवर निवडून गेले होते. पण राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना या जागेचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली.

सिमरनजीत सिंह मान हे यापूर्वी १९९९मध्ये शिरोमणी अकाली दल (अमृतसर) पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पक्षाचा शिरोमणी अकाली दलाशी संबंध नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: