ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी १६ ऑक्टोबरला मतदान

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी १६ ऑक्टोबरला मतदान

मुंबई: विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदा

तृतीयपंथी आणि निवडणुकीचा हक्क
२७१ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान
विदर्भातील पोटनिवडणुकांचे १९ जुलैला मतदान

मुंबई: विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0