कोरोनाच्या संकटाला आपण सर्वच जबाबदारः मोहन भागवत

कोरोनाच्या संकटाला आपण सर्वच जबाबदारः मोहन भागवत

नवी दिल्लीः कोरोना महासाथीची दुसरी लाट येत असल्याचा इशारा मिळूनही आपण सर्वांनी बेपर्वाई, निष्काळजीपणा दाखवला त्यामुळे देशाला आज मोठ्या आरोग्य संकटाला

ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, रुग्णालयांचे नियोजन
कुर्ल्याच्या नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोविड आणि राजकारण

नवी दिल्लीः कोरोना महासाथीची दुसरी लाट येत असल्याचा इशारा मिळूनही आपण सर्वांनी बेपर्वाई, निष्काळजीपणा दाखवला त्यामुळे देशाला आज मोठ्या आरोग्य संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. देशात फैलावलेल्या दुसर्या कोरोना लाटेवरची भागवत यांची ही पहिली प्रतिक्रिया असून त्यांनी या लाटेमुळे आलेल्या संकटाला देशातील समस्त जनता, सरकार, प्रशासन अशा सर्वांना जबाबदार धरले आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा डॉक्टरांनी पूर्वीच दिला होता तरीही त्याकडे आपण सर्वांनी दुर्लक्ष केले. बेजाबदारपणा दाखवला. आता कोरोनाची तिसरी लाट येईल असा इशारा दिला जात आहे. या लाटेला आपण घाबरणार आहोत का? असा सवाल करत भागवत यांनी ही लढाई लढण्याची व जिंकण्याची आपली पद्धत योग्य आहे का, असे प्रश्न उपस्थित केले.

संघपुरस्कृत ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ या श्रृंखलेत भागवत बोलत होते. सध्याच्या काळात लोकांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मकता आणण्याचे प्रयत्न अत्यावश्यक असल्याने वर्तमानातल्या अनुभवातून आपण शिकलो तर देशाच्या भविष्याकडे आपले लक्ष केंद्रीत होऊ शकते असे भागवत म्हणाले. आपण आपल्या चुकातून शिकलो तर तिसर्या लाटेचा यशस्वी मुकाबला करू असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात भागवत यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा उल्लेख केला. विन्स्टन चर्चिल यांच्या टेबलावर एक उद्धृत लिहिलेले असायचे, “या कार्यालयात कोणताही निराशावाद नाही. पराभवाच्या शक्यतेबद्दल कोणतीही उत्सुकता नाही कारण त्याचे अस्तित्वच नाही.”

भाषणात भागवत यांनी, जीवन व मृत्यूचे चक्र असेच चालत राहील… आपण कोणीच या क्षणी भयभीत नाही. ही परिस्थिती आपल्याला भविष्यासाठी अनेक बाबी शिकवून जाईल, असे विधान केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: