आम्हाला पत्रकारांची काळजी, आरोपांची चौकशी करूः एनएसओ

आम्हाला पत्रकारांची काळजी, आरोपांची चौकशी करूः एनएसओ

नवी दिल्लीः पीगॅसस स्पायवेअर संबंधित मानवाधिकार भंगाच्या कोणत्याही प्रकरणाची आम्ही चौकशी करू असे आश्वासन इस्रायल सर्विलान्स कंपनी एनएसओचे समूह सह-संस्

पिगॅससचा फास
नफ्ताली बेनेट इस्रायलचे नवे पंतप्रधान
इस्रायली मनांमधील भ्रम जगापुढे उघड  

नवी दिल्लीः पीगॅसस स्पायवेअर संबंधित मानवाधिकार भंगाच्या कोणत्याही प्रकरणाची आम्ही चौकशी करू असे आश्वासन इस्रायल सर्विलान्स कंपनी एनएसओचे समूह सह-संस्थापक शैलेव हुलियो यांनी दिले आहे.

जगभरातल्या अनेक पत्रकारांचे, राजकीय नेत्यांचे, मानवाधिकार-सामाजिक कार्यकर्त्यांचे हजारो फोन क्रमांक एनएसओच्या पीगॅसस या स्पायवेअरच्या मार्फत टॅप होत असल्याचा मोठा खुलासा रविवारी द वायर, वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील अन्य १४ वृत्तसंस्थांकडून झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली होती. पीगॅसस स्पायवेअर हे खासगी विक्रीसाठी नसून ते फक्त सरकार खरेदी करत असतात. या मुळे सरकारच हेरगिरी करत असल्याचा आरोप सुरू झाला व या प्रकरणाची चौकशी सुरू झाली पाहिजे अशी सर्व थरातून मागणी वाढू लागली.

या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात एनएनओ समूहाचे सहसंस्थापक शैलेव हुलियो यांची रविवारी मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. या मुलाखतीत हुलियो यांनी पत्रकारांचे फोन टॅप होणे ही दुर्दैवी बाब असून व्यवस्थेचा असा दुरुपयोग होणे हे चिंतेची बाब आहे. पण या प्रकरणात एनएसओचा कोणताही सहभाग नाही. पण आमच्या संस्थेवर आरोप होत असेल तर त्या प्रत्येक आरोपाची आम्ही चौकशी सुरू केली असून त्यात काही तथ्य आढळून आल्यास संबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे हुलियो यांनी आश्वासन दिले. हुलिओ यांनी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या स्वातंत्र्याचा आपली कंपनी आदर, सन्मान करते असेही म्हटले होते. आमच्या कार्यप्रणालीचा काही ग्राहकांकडून गैरवापर होत असतो, अशा ग्राहकांना देण्यात येणारी सेवा आम्ही तत्काळ बंद करत असतो. आम्ही आमच्य कार्यपद्धतीत पारदर्शकता व उत्तरदायित्व पाळण्याचा प्रयत्न करत असतो, असे हुलिओ यांनी स्पष्टीकरण दिले होते.

एनएसओने आपला एक पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात त्यांच्या सॉफ्टवेअरचा गैरवापर करत असल्याचे आढळून आल्यानंतर २०१६नंतर पाच ग्राहकांशी त्यांनी करार मोडला होता. त्यात गेल्या वर्षीचा एक करार आहे. गेल्या वर्षी जो करार मोडण्यात आला त्याला कारण पीगॅससच्या माध्यमातून एका व्यक्तीला सुरक्षा यंत्रणांचे कवच असताना त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

गेल्या वर्षी या कंपनीने मानवाधिकाराचे हनन झाल्या प्रकरणी दोन ग्राहकांशी असलेला करार तोडला होता.

या पार्श्वभूमीवर हुलिओ यांनी दिलेले आश्वासन अनेक प्रश्न उपस्थित करते. जर एनएसओला आपल्या ग्राहकांकडून होणार्या विशिष्ट हेरगिरीची माहिती नसेल तर ते कोणत्या पुराव्यावर आपण चौकशी करू असे आश्वासन देतात?

गार्डियन या दैनिकाच्या मते जगभरातल्या १८० पत्रकारांचे मोबाइल क्रमांक एनएसओच्या ग्राहकांनी पाळत ठेवण्यासाठी निश्चित केले होते. यात फायनॅन्शियल टाइम्सचे संपादक रुला खलाफ, मेक्सिकोचे पत्रकार सेसेलियो पिनेडा बिर्टो यांची नावे आहेत. बिर्टो यांचा मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आला होता व त्या नंतर एक महिन्यांनी त्यांची हत्या करण्यात आली होती.

गार्डियनच्या वृत्तामध्ये वॉल स्ट्रीट जर्नल, सीएनएन, न्यू यॉर्क टाइम्स, अल-जझिरा, फ्रान्स-24, रेडिओ फ्री युरोप, मीडियापार्ट, एल पाइस, असोसिएटेड प्रेस, ल माँद, ब्लूमबर्ग, एएफपी, द इकॉनॉमिस्ट, रॉयटर्स व व्हॉइस ऑफ अमेरिकासहित जगभरातल्या अन्य वृत्तसंस्था आहेत.

गार्डियनच्या मते संयुक्त अरब अमिरात, अझरबैजान, बहारिन, हंगेरी, भारत, कजाकिस्तान, मेक्सिको, मोरोक्को, रवांडा व सौदी अरेबिया या देशांतील सरकारांनी पीगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकारांवर पाळत ठेवली होती.

सौदी सरकारच्या विरोधात सातत्याने लिहिणारे व ज्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्या जमाल खशोगी या पत्रकारावर एनएसओ समुहाकडून पाळत ठेवण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. खशोगी यांच्या हत्येपूर्वी काही महिने व नंतर सुमारे एक वर्ष खशोगी यांच्याशी निकट असलेल्या दोन महिलांचे मोबाइल क्रमांकही एनएसओने पाळत ठेवण्यासाठी निश्चित केले होते.

भारतातले अनेक पत्रकार पीगॅससच्या रडारावर

भारतात पीगॅसस प्रोजेक्टच्या फोरेन्सिक चाचणीतून निष्पन्न झाले की, द वायरचे संस्थापक संपादक एमके वेणु व सिद्धार्थ वरदराजन व इंडियन एक्स्प्रेसचे माजी पत्रकार व द इंडिया केबलला सहकार्य करणारे सुशांत सिंह, परंजॉय गुहा ठाकुरता व एसएनएम अब्दी यांच्या मोबाइल क्रमांक पीगॅसस स्पायवेअरचे संक्रमण झाले होते.

द हिंदूच्या विजेता सिंह यांचा मोबाइल फोनही पीगॅससच्या माध्यमातून हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता.

महत्त्वाची बाब अशी की एमके वेणु व सुशांत सिंह यांच्या मोबाइलमध्ये २०१६ ते २०१९ या साला व्यतिरिक्त आजपर्यंतही पीगॅससने घुसखोरी केल्याचे आढळून आले होते.

द ट्रिब्यूनच्या राजनैयिक संपादक स्मिता शर्मा यांच्या मोबाइलमध्येही पीगॅससने घुसखोरीचे प्रयत्न दिसून आले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: