लुंगी-टोपी घालून दगडफेक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक

लुंगी-टोपी घालून दगडफेक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक

लुंगी व टोपी घालून ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या सहा जणांना मुर्शिदाबाद पोलिसांनी बुधवारी अटक केली. या सहा जणांमध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता अभिषेक सरकार

२३ व्या दिवशीही काश्मीरमधील जनजीवन विस्कळीतच
बंगालमध्ये भाजपच्या ५ रथयात्रा
देशात २०२४ अखेर एनआरसी पूर्ण : अमित शहा

लुंगी व टोपी घालून ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या सहा जणांना मुर्शिदाबाद पोलिसांनी बुधवारी अटक केली. या सहा जणांमध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता अभिषेक सरकार सामील होता. हे दंगलखोर सियालदाह-लालगोला दरम्यान जाणाऱ्या एका इंजिनवर दगडफेक करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. द टेलिग्राफने हे वृत्त दिले आहे.

या घटनेचा उल्लेख न करता प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात टोप्या विकत घेऊन ते आपल्या कार्यकर्त्यांना देत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दंगल करणारे कपड्यांवर ओळखता येतात असे जातीयवाचक विधान केले होते.

या घटनेसंदर्भात मुर्शिदाबादचे जिल्हा पोलिसप्रमुख मुकेश म्हणाले, या सहा जणांनी आपण युट्यूबसाठी एक व्हीडिओ तयार करत होतो त्यात लुंगी व टोपी घालून शुटिंग सुरू होते. पण या सहाही जणांना कोणते यूट्यूब चॅनेल आहे हे सांगता आले नाही.

राधामाधवतला या गावातील काही स्थानिकांनी भाजप कार्यकर्ता अभिषेक सरकार हा नजीकच्या श्रीशनगरमधील राहात असल्याचे सांगितले. अभिषेक व त्याचे साथीदार रेल्वे रुळालगत कपडे बदलत असल्याचे एका स्थानिकाने पाहिले तेव्हाच त्यांना शंका आली होती.

दरम्यान अभिषेक सरकारशी आपला संबंध नसल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर घोष यांनी केला आहे. राधामाधवतला येथे काय झाले त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असे घोष म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: