ममतांनी विरोधी पक्षांच्या बैठकीचे निमंत्रण धुडकावले

ममतांनी विरोधी पक्षांच्या बैठकीचे निमंत्रण धुडकावले

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारतबंदच्या दरम्यान राज्यात डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार केला जातो आणि आता चर्चेसाठी बोलावले जाते

राजस्थान : काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात
सुभाष चंद्रा यांचा पराभव
सरकारी खर्च कमी करण्याच्या काँग्रेसच्या सूचना

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारतबंदच्या दरम्यान राज्यात डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार केला जातो आणि आता चर्चेसाठी बोलावले जाते हा दोन्ही पक्षांचा हा दुटप्पीपणा असल्याचे सांगत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीचे निमंत्रण धुडकावले.

येत्या १३ जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून निर्माण झालेली अस्थिरता व देशातल्या अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांची सुरू असलेल्या निदर्शनांसंदर्भात सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपविरोधात देशपातळीवर विरोधी पक्षांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रीय स्तरावर एक भूमिका व प. बंगालमध्ये वेगळी भूमिका काँग्रेस व डाव्या पक्षांकडे घेतली जाते. हा दुटप्पीपणा असल्याने आपण उपस्थित राहू शकत नाही असे ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे.

बुधवारच्या भारतबंदमध्ये बंगालमध्ये काही भागात हिंसाचार, रेल्वे व परिवहन सेवा विस्कळीत झाली होती. पण ही अस्थिरता काँग्रेस व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली असा आरोप ममता बॅनर्जी यांचा आहे. मी केंद्राच्या धोरणांच्या विरोधात आहे व बंद घोषित करण्याचा कामगार संघटनांच्या उद्देशावरही माझी सहमती आहे पण आमचा पक्ष व सरकार बंदच्या विरोधात आहे. आमच्या राज्यातच डाव्यांनी काही ठिकाणी हिंसाचार घडवून आणला. ज्या राज्यांमध्ये या पक्षांनी बंद घडवून आणला त्या पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीविरोधात त्यावेळी आंदोलन केलेले नाही. आम्ही सत्तेत असून या दोन मुद्द्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्याला धाडस लागते असे त्या म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0