कोविड-१९चा पहिला ऑटोप्सी अहवाल काय सांगतो?

कोविड-१९चा पहिला ऑटोप्सी अहवाल काय सांगतो?

कोविड-१९ रुग्ण ऑक्सिजनची पातळी घसरूनही अस्वस्थ दिसत नाही.कोविड-१९ रुग्णामधील हवेच्या पिशवीत (एअर सॅक)एक विचित्र असा चिकट स्राव असतो.हा स्राव दोन फुप्फुसांमध्ये ऑक्सिजनची देवाणघेवाण होऊ देत नाही.

राष्ट्रपती भवनातील ११५ कुटुंबे विलिगीकरणात
२५ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे लसीकरण  
देशात ओमायक्रॉनचे २०० रुग्ण

सार्स-सीओव्ही-टूचा संसर्ग, प्राणघातकता, रोगजन्य घटक (पॅथोजेनीज)आणि उपचार यांबद्दल दररोज काहीतरी नवीन माहिती पुढे येत आहे. यातील अत्यंत लक्षणीय निरीक्षण म्हणजे व्हेंटिलेटर्सवर ठेवलेल्या रुग्णांची प्रकृती खूपच बिघडत आहे. एकदा का रुग्णाच्या शरीरात नळी घातली की त्याचा मृत्यू होण्याची शक्यता खूप वाढत आहे, असा बहुतेक सर्व केंद्रांचा अनुभव आहे.

कोविड-१९ रुग्णांच्या फुप्फुसांची पॅथोलॉजी अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिण्ड्रोमच्या (एआरडीएस) रुग्णांहून वेगळी दिसत आहे हे काही क्रिटिकल केअर डॉक्टर मोठा धोका पत्करून स्पष्ट करत आहेत.

ऑक्सिजनची तीव्र कमतरता असूनही कोविड-१९ रुग्णांच्या फुप्फुसांची यांत्रिक क्षमता कायम असते, असे संकेत इटलीतील आघाडीचे अतिदक्षता तज्ज्ञ डॉ.गॅटिनोनी ल्युशियानो यांनी दिले आहेत.

ऑक्सिजन संपृक्तता (सॅच्युरेशन)खालावलेली असतानाही कोविड-१९चे रुग्ण अत्यंत स्थिर भासतात, असे निरीक्षण न्यूयॉर्कमधील क्लिनिशिअन्सही नोंदवत आहेत. ऑक्सिजन संपृक्तता ५० टक्क्यांपर्यंत खालावलेली असतानाही रुग्ण आरामात फोनवर बोलताना आढळणे अगदीच सामान्य आहे. या अवस्थेला “हॅपी हायपोक्झिया” असे म्हटले जाते. हे रुग्ण कधीही अचानक कोसळू शकतात.इंट्युबेटिंग रुग्णाची ऑक्सिजन संपृक्तता घटायला सुरुवात झाल्यानंतरचे प्रारंभिक नमुने संशयाला कारण ठरत आहेत.कोविड-१९च्या रुग्णांना होणारा फुप्फुसांचा आजार हा एआरडीएस नसून वेगळ्या प्रकारचा आहे असा संशय हळुहळू बळावत चालला आहे.

ज्यांचा शरीरात ट्यूब घातली आहे अशा रुग्णांची प्रकृती खालावत जाते, असे कोविड-१९ रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कळून चुकले आहे. अशा रुग्णांचा मृत्यू होण्याचा दर ३० टक्के ते सुमारे १०० टक्के आहे.व्हेंटिलेटर्सद्वारे उच्च दाबाने आत ढकलली जाणारी हवा फुप्फुसांची अवस्था सुधारण्याऐवजी त्यांना धोका पोहोचवत असावी या शक्यतेवर क्रिटिकल केअर क्षेत्रातील डॉक्टरांमध्ये चर्चा सुरू आहे.

तीव्र हायपोक्झिया झालेले रुग्ण शुद्धीत असतील तर नाकपुडीत नळी घालून ऑक्सिजन दिल्यास त्यांची प्रकृती सुधारते असेही निरीक्षण काही डॉक्टरांनी नोंदवले आहे. मात्र, ते अद्याप पूर्ण सिद्ध झालेले नाही.

आणखी एक युक्ती म्हणजे रुग्णाला डाव्या किंवा उजव्या कुशीवर किंवा अगदी पालथे (पोटावर) झोपवावे. हे साधे तंत्र वापरले की मिनिटभराच्या आत ऑक्सिजन संपृक्तता लक्षणीयरित्या सुधारते. इंग्लंडच्या पंतप्रधानांवर ऑक्सिजन डिलिव्हरीसाठी साधे तंत्र वापरले गेले, असे म्हणतात. त्यांना जास्तीतजास्त सातत्यपूर्ण पॉझिटिव हवामार्ग दाबाद्वारे ऑक्सिजन दिला गेला असावा.

समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर गेले असता फुप्फुसांची जशी अवस्था होते (हाय अल्टिट्यूड सिकनेस)तशीच अवस्था कोविड-१९ रुग्णांच्या फुप्फुसांची होत असावी. एखाद्याला अॅक्लमटायझेशनसाठी (वातावरणाशी समायोजन साधणे)अजिबात वेळ न देता माउंट एव्हरेस्टवर सोडले असता त्याच्या फुप्फुसांची जी अवस्था होईल, तीच कोविड-१९च्या रुग्णांमध्ये होऊ शकते, असे न्यूयॉर्कमधील एका डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

सार्स-सीओव्ही-टू विषाणू रुग्णाच्या दोन्ही फुप्फुसांवर हल्ला चढवतो. नेहमीच्या न्यूमोनियामध्ये असे होत नाही. रुग्ण रुग्णालयात दाखल होतो तेव्हा त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावलेली असते पण त्याला काहीच त्रास जाणवत नसतो. अन्य आजारांमध्ये ऑक्सिजनची पातळी ८० टक्क्यांहून खाली घसरल्यास रुग्ण प्रचंड अस्वस्थ होतो पण कोविड-१९ रुग्ण ऑक्सिजनची पातळी घसरूनही अस्वस्थ दिसत नाही.कोविड-१९ रुग्णामधील हवेच्या पिशवीत (एअर सॅक)एक विचित्र असा चिकट स्राव असतो.हा स्राव दोन फुप्फुसांमध्ये ऑक्सिजनची देवाणघेवाण होऊ देत नाही. शक्ती वाढवून व्हेंटिलेटरद्वारे हवेचे पंपिंग करून घेण्याचा फारसा फायदा यात होत नाही.

कदाचित काही रुग्णांमध्ये व्हेंटिलेटर्स कमी दाबावर काम करू शकतील पण असे खरोखर शक्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी रॅण्डमाइझ्ड नियंत्रित चाचण्या घ्याव्या लागतील.सध्या तरी अनेक अतिदक्षता तज्ज्ञ रुग्णाला साध्या पद्धतीने ऑक्सिजन देण्यासाठीच प्रयत्न करत आहेत. न्यूयॉर्क शहरात कोविड-१९ रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्स वापरण्याचे प्रमाण साहजिकच खूप कमी झाले आहे. सध्याची पद्धत म्हणजे अगदी निवडक रुग्णांसाठीच व्हेंटिलेटर वापरणे आणि ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया शक्य तेवढी कमी आक्रमक ठेवणे.

ऑटोप्सी रिपोर्ट्स

क्लीवलॅण्ड क्लिनिक अमेरिकेतील आघाडीच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या रुग्णालयांतून आलेल्या पहिल्या ऑटोप्सी रिपोर्टमुळे ऑक्सिजन देण्याच्या साध्या तंत्रांच्या परिणामकारकतेवर शिक्कामोर्तब झाले. या अहवालात केवळ दोन रुग्णांचे निरीक्षण आहे पण यातून बरेच काही स्पष्ट होते.

यातील पहिला रुग्ण कोरोनाविषाणूची लागण होऊन मृत्यू झालेला एक ७७ वर्षांचा स्थूल वृद्ध होता. त्यांना हायपरटेन्शनचा त्रास होता. या रुग्णाच्या ऑटोप्सीमध्ये त्याच्या फुप्फुसाच्या पिशव्यांमध्ये जाड पेंटसदृश घटक दिसून आला होता. या रुग्णाला आरटी-पीसीआरचे निदान झाले होते. त्याला सहा दिवस ताप व थंडी ही लक्षणे जाणवत होती. या रुग्णाचा व्हेंटिलेटरवर ठेवण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याची फुप्फुसे सुजलेली व हानीग्रस्त होती. विषाणूमुळे फुप्फुसांमध्ये सर्वत्र लिम्फोसाइट्स दिसत होती.

दुसऱ्या रुग्णालाही सार्स-सीओव्ही-टूची लागण झाली होती पण त्याचा मृत्यू त्यामुळे झाला नाही. हा ४२ वर्षांचा रुग्ण बॅक्टेरियल न्यूमोनियाने दगावला. त्याला ताप, खोकला व थंडी अशा लक्षणांसह गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूपूर्वी करण्यात आलेल्या त्याच्या सीटी स्कॅनमध्ये दोन्ही फुप्फुसांत ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज (अस्पष्टता)आढळल्या होत्या.

सार्स-सीओव्ही-टूसाठी नॅजोफॅरिंजीअल स्वॅब्जची चाचणी पॉझिटिव होती पण फुप्फुसातील स्वॅब्जची चाचणी निगेटिव होती. फुप्फुसांमध्ये अन्नकण आढळले होते आणि त्यात जीवाणू वाढू शकतात. अंतिम ऑटोप्सीमध्ये कोविड-१९ची नोंद एक अवस्था म्हणून होती, कारण म्हणून नव्हती. रुग्ण बॅक्टेरिअल न्युमोनियामुळे हवा श्वासाद्वारे शरीरात ओढली जाऊन (अॅस्पिरेशन) दगावला होता. अहवालकर्त्याने लिहिले होते, “तात्पर्य, रुग्णाचा मृत्यू कोविड-१९ प्रादुर्भावासह झाला, कोविड-१९मुळे झाला नाही.”

एखाद्या रुग्णाचा मृत्यू सार्स-सीओव्ही-टूहून वेगळ्या अवस्थेमुळेही होऊ शकतो. म्हणजेच हा विषाणू केवळ उपस्थित असू शकतो, कारणीभूत असेलच असे नाही. तर एखादा रुग्ण सार्स-सीओव्ही-टूमुळेही दगावू शकतो. हा फरक केवळ क्लिनिकल निष्कर्षाद्वारे होऊ शकत नाही. इटलीत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी किती जण कोविड-१९मुळे दगावले आणि किती जणांमध्ये कोविड-१९ विषाणूचा केवळ प्रादुर्भाव झालेला होता, हे सांगणे कठीण आहे, हे वैद्यकीय व्यावसायिकांनी पूर्वीच मान्य केले आहे.

कोविड-१९ साथीच्या संदर्भात मृत्यूच्या कारणाबाबत लवचिकता ठेवत असल्याचे यूएस सेंटर्स फॉर डिसीझ कंट्रोलनेही स्पष्ट केले आहे. मृत्यूचे प्रमाणपत्र भरताना सार्स-सीओव्ही-टूची लागण झाली आहे की नाही यावर शिक्कामोर्तब करणे सक्तीचे नाही यातच सगळे आले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: