संभाषण खासगी व सुरक्षितः व्हॉट्सअपचा खुलासा

संभाषण खासगी व सुरक्षितः व्हॉट्सअपचा खुलासा

नवी दिल्लीः व्हॉट्सअप या सोशल मीडिया कंपनीने आपल्या नव्या खासगी धोरणावर अखेर मंगळवारी खुलासा जारी केला. व्हॉट्सअपच्या नव्या धोरणाचा ग्राहकांच्या खासगी

‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा
‘फेसबुक’चा फसवा चेहरा
लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र

नवी दिल्लीः व्हॉट्सअप या सोशल मीडिया कंपनीने आपल्या नव्या खासगी धोरणावर अखेर मंगळवारी खुलासा जारी केला. व्हॉट्सअपच्या नव्या धोरणाचा ग्राहकांच्या खासगी संभाषणावर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांचे मोबाइल क्रमांक व त्यांच्या समूह गटाची कोणतीही माहिती फेसबुक या अन्य सोशल मीडियावर सार्वजनिक केली जाणार नाही. किंवा या माहितीचा उपयोग करून त्यांच्यावर जाहिरातींचा मारा केला जाणार नाही. व्हॉट्स अप व फेसबुक त्यांच्या कोणत्याही ग्राहकांचे दूरध्वनी संभाषण ऐकत नाही अथवा ते संदेश वाचत नाही, असे या खुलाशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात व्हॉट्सअपने आपल्या नव्या सेवा व खासगी धोरणात बदल करत त्यांच्याकडे जमा होणारी माहिती आपली सहकारी कंपनी फेसबुकशी संलग्न करणार असल्याचे सांगत हे धोरण मान्य असणार्यांना व्हॉट्सअप सेवा मिळणार असे जाहीर केले होते. व्हॉट्सअपने त्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ ही अंतिम तारीखही जाहीर केली होती.

व्हॉट्सअपच्या या नव्या घोषणेनंतर सोशल मीडियात खासगी संभाषण, चर्चा, व्हीडिओ, ग्रुप चॅटींग यावर मोठ्या प्रमाणात विडंबनात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. लोकांच्या खासगी जीवनातले प्रसंग आता फेसबुकवर जाहीर होणार, अशी भीतीही पसरली होती. व्हॉट्सअपवरील विविध विषयांवरचे ग्रुप, त्यावर चालणारी चर्चा खासगी स्वरुपाची असल्याने असे ग्रुप सोडून टेलिग्राम, सिग्नल अशा नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवे ग्रुप सुरू होऊ लागले होते.

अखेर आपला मोठ्या प्रमाणातला ग्राहक संभ्रमावस्थेत असल्याने आपली कंपनी सोडून अन्य सोशल मीडिया कंपनीकडे जात असल्यानंतर व्हॉट्सअपला जाग आली आणि त्यांनी आमच्या नव्या धोरणाचा खासगी किंवा व्यावसायिक संभाषणावर कोणताही अंकुश असणार नाही किंवा हे संभाषण सार्वजनिक करण्याचा कोणताही हेतू नाही किंवा कोणाचीही माहिती आम्ही फेसबुकवर जाहीर करणार नाही, असे कंपनीला स्पष्ट करावे लागले.

आम्ही केवळ ग्राहकांचे मोबाइल क्रमांक घेत असतो कारण त्यामुळे आमची सेवा जलदगतीने ग्राहकांना मिळत असते. पण हे मोबाइल क्रमांक कोणालाही दिले जाणार नाहीत, असे व्हॉट्सअपने म्हटले आहे.

गूगलचा व्हॉट्सअपवर डोळा

व्हॉट्सअपच्या नव्या खासगी धोरणामुळे त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यात इंटरनेट सेक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजाहरिया यांनी, व्हॉट्सअपचे १,७०० खासगी ग्रुप गूगलवर दिसत असल्याचा दावा केला होता. त्याने खळबळ माजली. त्यावर व्हॉट्सअपने आम्ही ग्राहकांना त्यांचे संभाषण आपोआप नष्ट होण्याची एक अतिरिक्त सेवा दिल्याचे सांगितले.

मूळ बातमी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: