‘कप्पा’ व ‘डेल्टा’ – भारतीय कोरोना व्हेरिएंटचे नाव

‘कप्पा’ व ‘डेल्टा’ – भारतीय कोरोना व्हेरिएंटचे नाव

जीनिव्हाः आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617.1 आणि B.1.617.2 या दोन विषाणू प्रकारांना (व्हेरिएंट) ‘कप्पा’ व ‘डेल्टा’ अस

वर्षभराचे वेतन मुकेश अंबानींनी नाकारले
सोमवारी (कथित) ‘विक्रम’, मंगळवारी लसीकरणात घसरण
इंटरनेटवर मदत मागण्यांवर गुन्हे नकोः सर्वोच्च न्यायालय

जीनिव्हाः आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617.1 आणि B.1.617.2 या दोन विषाणू प्रकारांना (व्हेरिएंट) ‘कप्पा’ व ‘डेल्टा’ असे नाव दिले आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आली. सर्वसामान्यांना कळावे म्हणून त्यांची नावे अल्फा, बीटा, गॅमा या ग्रीक आद्याक्षरांप्रमाणे ठेवल्याचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे.

B.1.617.1 या कोरोना विषाणू प्रकाराला भारतीय विषाणू प्रकार म्हटल्यावर भारताने त्याला आक्षेप घेतला होता. पण आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेनेही आपण त्याला भारतीय विषाणू म्हटले नाही, असे स्पष्ट केले होते. या गोंधळानंतर तीन आठवड्याने आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूंना नावे दिली आहेत. कोरोना विषाणूमध्ये वेगाने बदल होत आहेत आणि ज्या प्रदेशात होत आहेत, त्याचे नामकरण करणे गरजेचे असल्याचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेचे मत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0