आपत्कालिन लस म्हणून कोवॅक्सिनला मंजुरी

आपत्कालिन लस म्हणून कोवॅक्सिनला मंजुरी

नवी दिल्लीः भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधित लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने आपत्कालिन लस म्हणून अखेर मंजुरी द

ब्राझील- भारत बायोटेक (कोवॅक्सिन) करार रद्द
३ जानेवारीपासून किशोरांचे लसीकरण
‘भारत बायोटेक’चा नवा प्लॅन्ट पुण्यात

नवी दिल्लीः भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधित लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने आपत्कालिन लस म्हणून अखेर मंजुरी दिली आहे. कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे काही आक्षेप होते, त्यामुळे या लसीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी नव्हती व त्यामुळे तिची निर्यात होत नव्हती..

गेल्या २६ ऑक्टोबरला जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने भारत बायोटेककडे लसींच्या चाचणीबद्दल व लसीच्या परिणामकारकतेबाबत स्पष्टीकरण मागितले होते. या स्पष्टीकरणात आपत्कालिन परिस्थितीत ही लस किती परिणामकारक ठरू शकते अशी विचारणा करण्यात आली होती. कंपनीच्या स्पष्टीकरणावर तांत्रिक सल्लागार समितीने सहमती दर्शवली. त्यानंतर या समितीने कोवॅक्सिन लस कोविड रुग्णावर आपत्कालिन परिस्थितीत वापरण्याबाबत हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले. त्यावर बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केले.

कोवॅक्सिन लसीची परिणामकारकता ७७.८ टक्के इतकी आहे. तसेच ती नव्या डेल्टा व्हेरिएंटवर ६५.२ टक्के गुणकारी ठरल्याचे दिसून आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0