धार्मिक तणावावर मोदी गप्प का?; १३ पक्षांचे मोदींना पत्र

धार्मिक तणावावर मोदी गप्प का?; १३ पक्षांचे मोदींना पत्र

नवी दिल्लीः देशात हिजाब, गोमांस, मशिंदीवरील भोंगे यावरून जो धार्मिक तणाव निर्माण केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा खरमरीत सवाल १३ प्र

सोन्याचे मासे, चवऱ्या आणि सोन्याचा तराजू!
केंद्र सरकारला देशद्रोह कायद्याच्या पुनर्विचाराची गरज वाटत नाही
बंगालमधील हिंसाचार कथांना बनावट बातम्यांचा आधार

नवी दिल्लीः देशात हिजाब, गोमांस, मशिंदीवरील भोंगे यावरून जो धार्मिक तणाव निर्माण केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा खरमरीत सवाल १३ प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी एका पत्राद्वारे केला आहे. शनिवारी विरोधी पक्षांनी एक पत्र जारी केले असून खाणे-पिणे, धार्मिक श्रद्धा यांच्यावरून देशात ध्रुवीकरण केले जात अशा कठीण परिस्थितीत नरेंद्र मोदींचे मौन आश्चर्यकारक असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. देशात हिंसाचाराच्या घटना ऐकायला मिळत असताना व त्याला उत्तेजन देणारे घटक दिसत असताना पंतप्रधान एकही शब्द बोलू शकत नाहीत. त्यांच्या अनेक विषयांवरच्या प्रतिक्रियातून ते दिसतही नाही. ते हिंसाचार करणाऱ्या संघटनांचा निषेध करत नाहीत. त्यांचे हे मौन अशा सशस्त्र संघटनांना संरक्षण देणारे वाटत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, द्रमुकचे अध्यक्ष स्टालिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, राजदचे अध्यक्ष तेजस्वी यादव , भाकपचे सरचिटणीस डी. राजा, देबब्रत बिस्वास, मनोज भट्टाचार्य, दीपांकर भट्टाचार्य, पी. के. कुन्हालीकुट्टी या १३ नेत्यांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.

देशातील अनेक राज्यांत अलीकडेच घडलेल्या धार्मिक हिंसाचाराचा मुद्दा या पत्रात अधोरेखित करताना हिंसाचाराच्या घटनांबाबत जी वृत्ते मिळत आहेत, त्यानुसार ज्या भागांत या घटना घडल्या तिथे एकसारखा पॅटर्न राबवला गेला. धार्मिक मिरवणूक काढण्याआधी प्रक्षोभक भाषणे दिली गेली. सोशल माध्यमांचाही द्वेष पसरवण्यासाठी वापर करण्यात आला. ही सगळीच स्थिती भीतीदायक आणि चिंता वाढवणारी आहे’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: