संजय गांधी पार्कची वन्यप्राणी दत्तक योजना

संजय गांधी पार्कची वन्यप्राणी दत्तक योजना

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इ

साथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय
आरे मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरूच राहणार
पोलिसांना महिला कार्यकर्त्याकडून हवी ५० लाखांची हमी

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे

वाघः रुपये ३,१०,०००, सिंहः रुपये ३,००,०००, बिबटः रुपये १,२०,०००, वाघाटीः रुपये ५०,०००

नीलगायः रुपये ३०,०००, चितळः रुपये २०,०००, भेकरः रुपये १०,०००,

या संदर्भात अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरिता इच्छुकांनी वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय

ईमेल

[email protected]

भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४ यावरही संपर्क साधता येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: