‘राजकीय संन्यास घेईन पण भाजपशी युती नाही’

‘राजकीय संन्यास घेईन पण भाजपशी युती नाही’

नवी दिल्लीः आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांत आपला पक्ष भाजपशी कदापी युती करणार नाही, असे स्पष्ट विधान बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी सो

जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)
पक्ष सहकार्याने कट रचलाः भाजप नेत्या पामेलाचा आरोप
पंजाबमध्ये मनपा निवडणुकांत भाजपचा धुव्वा

नवी दिल्लीः आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांत आपला पक्ष भाजपशी कदापी युती करणार नाही, असे स्पष्ट विधान बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी सोमवारी केले. भाजप व बसपाची विचारधारा पूर्णतः भिन्न आहे, भाजपसारख्या कडव्या धार्मिक विचारसरणीचे राजकारण करणार्या पक्षाला समर्थन देण्यापेक्षा राजकारणातूनच आपण संन्यास घेऊ असेही त्या म्हणाल्या.

उ. प्रदेशातील राज्यसभा जागांच्या होणार्या निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीने बसपाच्या विरोधात एका अपक्ष उमेदवाराला उभे करून त्याला पाठिंबा दिल्याप्रकरणी संतप्त झालेल्या मायावतींनी २७ ऑक्टोबर रोजी सपाला हरवण्यासाठी वेळप्रसंगी भाजपला आपले मत देऊ असे विधान केले होते. या वादग्रस्त विधानानंतर मायावती स्वतः अडचणीत आल्या होत्या. मायावतींच्या या विधानावर भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी आगामी निवडणुकांमध्ये मायावतींचा थेट सामना भाजपपेक्षा समाजवादी पार्टीशी होईल असे संकेत तयार झाले होते. मायावतींनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला होता. सपा व काँग्रेस आपल्या उमेदवाराविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत आगामी विधान परिषद निवडणुकांत सपाच्या उमेदवारांना हरवण्यासाठी प्रसंगी भाजपशी युती करू असा इशारा त्यांनी दिला होता.

सोमवारी मात्र त्यांनी बसपा सर्वधर्म हितैषी पक्ष असून तो भाजपाच्या विचारसरणीपेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट करत अशा कट्टरवादी, भांडवलशाही, जातीय पक्षाशी कोण युती करेल असे उत्तर दिले. आम्ही या पक्षाच्या विरोधात सर्व पातळ्यांवर लढू, कुणासमोर मान तुकवली जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.

उ. प्रदेशमधील १० राज्यसभा जागांवरील उमेदवार बिनविरोध विजयी

दरम्यान, उ. प्रदेशातल्या १० राज्यसभा जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. ही मुदत संपताच निवडणूक अधिकार्यांनी सर्व १० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. या १० उमेदवारांमध्ये ८ जागा भाजपच्या असून एक समाजवादी पार्टी व एक बहुजन समाज पार्टीची आहे. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे नाव आहे.  भाजपने आपली उरलेली मते बसपाच्या रामजी गौतम यांना दिली. या निकालाने भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ ९२ तर काँग्रेसचे ३८ इतके झाले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: