ब्रिटनमध्ये तापमानाचा उच्चांक, फ्रान्स-स्पेनमध्ये वणवे

ब्रिटनमध्ये तापमानाचा उच्चांक, फ्रान्स-स्पेनमध्ये वणवे

लंडनः संपूर्ण युरोपमध्ये उष्णतेची लाट आली असून मंगळवारी ब्रिटनमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहचले. त्यानंतर सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल

स्वीडन, फिनलंडचा नाटोत प्रवेशाचा प्रस्ताव
हाया सोफियाः ऐक्याकडून दुहीकडे प्रवास
आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी

लंडनः संपूर्ण युरोपमध्ये उष्णतेची लाट आली असून मंगळवारी ब्रिटनमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहचले. त्यानंतर सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. २०१९मध्ये ब्रिटनमध्ये सरासरी तापमान ३८.७ अंश सेल्सियस इतके नोंदले गेले होते. तो आकडा यंदा पार झाला आहे. ब्रिटनमधल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झालेला दिसून आला. अनेक ठिकाणी रेल्वे व विमान वाहतूक विस्कळीत झाली. यंदा आलेली उष्णतेची लाट व्हिक्टोरिया काळात बांधलेल्या पायाभूत सुविधांवर परिणाम करेल अशी भीती वाहतूक मंत्री ग्रँट शाप्स यांनी व्यक्त केली.

ब्रिटनपाठोपाठ जर्मनीच्या दक्षिण, पश्चिम भागात व बेल्जियममध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे.

एन्व्हॉयरमेंटल रिसर्च क्लायमेट या जर्नलने यंदा उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येईल, असे भाकीत केले होते. ही लाट ग्लोबल वार्मिंगमुळे असेल, असेही या जर्नलमध्ये नमूद करण्यात आले होते.

२०२२च्या संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालाने पुढील २८ वर्षांत युरोपमधील वणवे सध्याच्या तुलनेत ३० टक्के अधिक असतील अशी भीती व्यक्त केली आहे.

वणवेही पेटले

युरोपमधल्या उष्णतेच्या या लाटेमुळे फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालमध्ये काही ठिकाणी वणवे पेटले आहेत. स्पेनमध्ये ३० ठिकाणी वणवे पेटले असून कॅस्टिल, लिऑन व गॅलिसिया या ठिकाणी ४ वणवे पेटले आहेत. तर झामोरा प्रांतातील लोसासिओ भागातील ३२ खेड्यांमधील ६ हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या वणव्यात २ जणांचा मृत्यू झाला व तिघे अत्यवस्थ असल्याचे समजते. गॅलिसियामधील १५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या वणव्यांमध्ये ७० हजार हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. ही जळलेली जमीन गेल्या दशकात वणव्याने खाक झालेल्या जमिनीपेक्षा दुप्पट असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

स्पेनला लागून असलेल्या पोर्तुगालच्या मध्य व उत्तरेकडील ५० महापालिका क्षेत्रात ५ मोठ्या वणव्यांचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले. या भागात सुमारे हजाराहून अधिक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

फ्रान्सच्या गिरोंड प्रांतात लागलेल्या वणव्यांमुळे ३४ हजार नागरिकांना हलवावे लागले.  येथे २ हजार अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असून १९३०० हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे.

ग्रीसमध्ये गेल्या २४ ठिकाणी ७३ आगी नियंत्रणात आल्या गेल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: