लादेन कुटुंबियांकडून राजपुत्र चार्ल्सला १० लाख पौंड देणगी

लादेन कुटुंबियांकडून राजपुत्र चार्ल्सला १० लाख पौंड देणगी

डीडब्लूः ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांना देणगी म्हणून ओसामा बिन लादेन याच्या कुटुंबियांकडून १० लाख पौंड इतकी घसघशीत देणगी मिळाल्याचे वृत्त ब्रिटनमधील

सूर्य पाहिलेला माणूस गेला
जहाल विद्यार्थी आंदोलनांनीच मोदी यांच्या कारकीर्दीची सुरुवात
‘पर्यावरण प्रभाव मूल्यांकन २०२० ’ – विनाशाकडे नेणारा मसुदा

डीडब्लूः ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांना देणगी म्हणून ओसामा बिन लादेन याच्या कुटुंबियांकडून १० लाख पौंड इतकी घसघशीत देणगी मिळाल्याचे वृत्त ब्रिटनमधील एक वृत्तपत्र द संडे टाइम्सने दिले आहे.

ब्रिटनच्या राजघराण्याची ना नफा तत्वावरची द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड ही संस्था असून २०१३ साली लादेन कुटुंबातील एक प्रमुख बक्र बिन लादेन व त्याचा भाऊ शफीक यांच्याकडून १० लाख पौंड इतक्या रकमेची देणगी मिळाल्याचे द संडे टाइम्सचे म्हणणे आहे.

बक्र बिन लादेन हा न्यू यॉर्क येथील ट्विन टॉवर इमारतीवर दहशतवादी हल्ल्यामागचा सूत्रधार व अल-काइदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा सावत्र भाऊ आहे.

द संडे टाइम्सच्या वृत्तानुसार २०१३मध्ये लंडन येथे चार्ल्स यांनी बक्र बिन लादेन याची भेट घेतली व त्यांच्याकडून देणगी स्वीकारत असल्याचे मान्य केले. पण राजघराण्याने अशी कोणतीही देणगी स्वीकारू नये असा सल्ला चार्ल्स यांना दिला होता. तरीही चार्ल्स यांनी ही देणगी स्वीकारली.

आता चार्ल्स यांच्या कार्यालयाने बक्र बिन लादेनकडून देणगी स्वीकारल्याचे मान्य केले आहे. हा पैसा चार्ल्स यांच्याकडे जमा झालेला नसून तो संस्थेकडे असल्याचे क्लेरेन्स हाउसने स्पष्ट केले आहे. ही देणगी स्वीकारावी असा प्रस्ताव संस्थेतील पाच ट्रस्टींनी मान्य केला आहे.

लादेन कुटुंबियांकडून एवढ्या मोठ्या रकमेची देणगी स्वीकारल्यानंतर ७३ वर्षांचे चार्ल्स अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर लाखो पौंडच्या देणग्या स्वीकारल्याचे या आधीही आरोप झाले आहेत.

गेल्या महिन्यात द संडे टाइम्सने चार्ल्स यांच्या संदर्भात एक खळबळजनक वृत्त दिले होते. त्यात कतारचे माजी पंतप्रधान शेख हमाद बिन जासिम बिन जाबेर अल थानी यांनी ३० लाख डॉलर इतकी देणगी चार्ल्स यांना दिली होती आणि ती चार्ल्स यांनी स्वीकारल्याचे म्हटले होते.

त्या आधी ब्रिटिश प्रसार माध्यमांनी सौदी अरेबियातील अनेक धनाढ्य व्यक्तींनी त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व व अन्य सन्मान हवेत म्हणून चार्ल्स चॅरिटिज व प्रिन्स फाउंडेशन अशा संस्थांना लाखो डॉलरच्या देणग्या दिल्या होत्या अशी वृत्ते दिली आहेत. सौदीतील एक बडा उद्योजक मोहफूज मरेई मुबारक बिन मोहफूज यांनी स्वतःचे प्रकल्प विकसित करण्यासाठी चार्ल्स यांना मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यावरून प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंडचे प्रमुख मायकेल फ्वॉसेट यांनी राजीनामा दिला होता. या प्रकरणाचा पोलिस तपास अजूनही सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0