जगासाठी अन्नधान्याची निर्यात मोकळीः युक्रेन-रशियामध्ये करार

जगासाठी अन्नधान्याची निर्यात मोकळीः युक्रेन-रशियामध्ये करार

नवी दिल्लीः युक्रेन व रशियादरम्यानच्या संघर्षामुळे अन्नधान्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता व या दोन देशांमधून अन्नधान्याची होणारी निर्यातही मं

‘बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींना जन्मठेपच द्या’
इयत्ता १०वी व १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी
लखिमपुर हिंसाचारः मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख

नवी दिल्लीः युक्रेन व रशियादरम्यानच्या संघर्षामुळे अन्नधान्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता व या दोन देशांमधून अन्नधान्याची होणारी निर्यातही मंदावली होती. या प्रश्नावर शुक्रवारी रशिया व युक्रेनने तोडगा काढत अन्नधान्य निर्यात सुलभ व्हावी म्हणून सामंजस्य करार केला. या करारामुळे आता काळ्या समुद्रातून जगाला अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता वाढली आहे.

शुक्रवारी झालेला करार सुमारे १० अब्ज डॉलर अन्नधान्य निर्यातीचा असून या करारामुळे गेल्या वर्षी उत्पादन झालेल्या एकूण धान्यातील २ कोटी टन धान्य आता आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे.

रशिया व युक्रेनदरम्यान अन्नधान्य निर्यातीस मोकळे करण्याच्या करारामुळे दोन्ही देशातल्या दुष्काळावर मात होण्याची शक्यता बळावली आहे. त्याच बरोबर गहू, सूर्यफूल तेल, खते व अन्य वस्तू कमी किमतीत बाजारात विक्रीला येतील असा विश्वास दोन्ही देशांकडून व्यक्त केला जात आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काळ्या समुद्रावर रशियाचे नियंत्रण वाढले होते. रशियाने युक्रेनच्या बंदरांवरून होणारी निर्यातही बंद केली होती, त्यामुळे लाखो टन धान्य अनेक जहाजांवर अडकून पडले होते. याने अन्नधान्याच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यात पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध आणल्यानेही अन्नधान्य व इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या.

पण मॉस्कोने या परिस्थितीला आपण जबाबदार नसल्याचे सांगण्यास सुरूवात केली. पाश्चिमात्य राष्ट्रे व युक्रेनच याला जबाबदार असल्याचा आरोप रशियाकडून सुरू होता.

आता युक्रेनच्या अनेक बंदरांमधून होणाऱ्या निर्यातीला रशियाने परवानगी दिल्याने आयात-निर्यात व्यापार सुरळीत होईल, अशी आशा युक्रेन व रशियाने व्यक्त केली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0