यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यास अधिक पाणी मिळणार

यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यास अधिक पाणी मिळणार

मुंबई: निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे य

तिवरे धरण दुर्घटना – जगण्याचा संघर्ष सुरूच
महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप
मुळशी धरणग्रस्तांचा सत्याग्रह

मुंबई: निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय मराठवाड्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी सांगितले की, गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहे, असे गृहीत धरून आंध्रप्रदेश शासनासोबत चर्चा केली जात होती.

अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले.

या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूस, अरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0