‘योगी म्हणून अयोध्येतील मशीद कार्यक्रमास जाणार नाही’

‘योगी म्हणून अयोध्येतील मशीद कार्यक्रमास जाणार नाही’

नवी दिल्लीः मुख्यमंत्री म्हणून नव्हे पण योगी म्हणून अयोध्येतल्या मशिदीच्या कार्यक्रमास बोलावल्यास आपण जाणार नाही पण हे निमंत्रण मुख्यमंत्री म्हणून दिल

योगी सरकारमध्ये ब्राह्मण व ओबींसीना प्रतिनिधित्व
निवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार
उ. प्रदेशात निवडणुका ८० विरुद्ध २० होतील : आदित्य नाथ

नवी दिल्लीः मुख्यमंत्री म्हणून नव्हे पण योगी म्हणून अयोध्येतल्या मशिदीच्या कार्यक्रमास बोलावल्यास आपण जाणार नाही पण हे निमंत्रण मुख्यमंत्री म्हणून दिल्यास आपण ते स्वीकारू शकतो, असे वक्तव्य उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपण योगी आणि हिंदू असल्याने मशीद निर्माण कार्यक्रमात जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट केले.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिराबरोबर मशिदही उभी राहावी म्हणून निर्णय दिला होता. आणि मशिदीला जागाही ठरवून दिली होती. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत व योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राममंदिर भूमीपूजन झाले होते. आता त्यानंतर मशीद निर्माणाचे काम कधी सुरू होणार याच्या चर्चा सुरू झाल्या. त्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांना हा प्रश्न विचारण्यात आला.

आदित्यनाथ यांनी या प्रश्नाच्या निमित्ताने अन्य राजकीय नेत्यांच्या सणाच्या निमित्ताने लावल्या जाणार्या उपस्थितीवरही टीका केली. इफ्तारच्या पार्ट्यांचे निमंत्रण स्वीकारून डोक्यावर टोपी खालून सेक्युलरवाद सिद्ध होत नाही. जनतेलाही हे ढोंग आहे असे वाटते, असा आरोप त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: