‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’

‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला जनताकेंद्रीत आर्थिक धोरणे आखण्याची इच्छा नसून अर्थव्यवस्थेत नेमक्या काय समस्या निर्माण झाल्या आहेत त्याची माहिती घेतली

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण
नुपूर, जिंदालवर कारवाईसाठी देशात मुस्लिमांची निदर्शने
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला जनताकेंद्रीत आर्थिक धोरणे आखण्याची इच्छा नसून अर्थव्यवस्थेत नेमक्या काय समस्या निर्माण झाल्या आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. याबाबत सरकारचे औदासिन्य असून ते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यातून दिसत असल्याची टीका माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी येथे केली. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बुधवारी निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या सध्याच्या अवस्थेला डॉ. मनमोहन सिंग व रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे जबाबदार असल्याची टीका अमेरिकेत केली होती. या टीकेला उत्तर देताना डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेत नेमके काय प्रश्न तयार झाले आहेत हे सरकारने शोधले पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे न सापडल्याने प्रत्येक समस्येला विरोधी पक्षालाच जबाबदार धरण्याची सवय सरकारला लागली असल्याचे, ते म्हणाले. काँग्रेस राजवटीत संकटग्रस्त शेतकऱ्याला मदत सरकारकडून लगेच केली जायची, त्यांची कर्जे माफ केली जायची. पण सध्याच्या सरकारकडून सर्वच पातळीवर औदासिन्य दाखवल्याने व आर्थिक मंदी आल्याने परिस्थिती गंभीर होत चालल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारी मुंबई व महाराष्ट्र राज्य गंभीर संकटात असल्याचाही आरोप केला. गेल्या पाच वर्षांत राज्यात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत, त्याला जबाबदार केंद्र व राज्यांची लोकविरोधी धोरणे आहेत. या राज्यातील प्रत्येक तिसरा तरुण हा बेरोजगार आहे. ग्रामीण भागात वेगाने बेरोजगारी वाढल्याने युवकांचे शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. हे राज्य एकेकाळी देशातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक राज्य होते आता हे राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येत देशातील पहिले झाले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रात मळभ आले आहे. उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. अशावेळी सरकारने उद्योगधंदे वाचवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या घोषणेवर आपले मत व्यक्त करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक विकासदर हा १०-१२ टक्के असणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले.

डॉ. मनमोहन सिंग यांनी या वेळी आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेतील खातेदारांशीही संवाद साधला.

‘काँग्रेसला राष्ट्रभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही’

या पत्रकार परिषदेत डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसला कोणत्याही पक्षाकडून राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने ३७० कलम हटवण्याच्या बाजूने आपले मत दिले आहे पण ते ज्या पद्धतीने हटवले गेले आहे, त्याला विरोध केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळीतील भूमिका सर्वांना माहिती आहे, या चळवळीत भाजप व संघपरिवाराने सहभाग घेतला नव्हता. त्यांच्याकडून काँग्रेसला राष्ट्रभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे ते म्हणाले.

‘सावरकरांना नव्हे तर हिंदुत्वाला विरोध’

सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत डॉ. मनमोहन सिंग यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला विरोध करत असल्याचे स्पष्ट केले. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे टपाल तिकिट काढले होते याची आठवण  त्यांनी करून दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: